पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रस्तावित हरित प्राधिकरण – ३०० कोटी वृक्ष …
Read More »छगन भुजबळ यांची माहिती, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाला भाजपाची परवानगी लागणार मुख्यमंत्री म्हणतात अजित पवारांनी कधीही चर्चा केली नाही
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला सुरूवात झाली. दावे प्रतिदावे केले जात असतानाच अजित पवार गटाचे जेष्ठ नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आता भाजपाला विचारल्या शिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे वक्तव्य नाशिक येथे बोलताना केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, दोन्ही ठाकरे बंधू जसे …
Read More »या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुट्टी ७ फेब्रुवारीस मतदान, उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी
राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे. यानुसार, निवडणूक होणाऱ्या …
Read More »शरद पवार यांचा तटकरे, पटेल यांना टोला, बैठकीत नसणाऱ्यांना काय माहित असणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या टोला
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. त्यांच्या चितेची राख थंड होत नाही तोच अस्थिविसर्जनापुर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दरम्यानच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाबाबत मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र या संदर्भात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठकीत …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये त्यासाठी हा कट शिजला सुनेत्रा पवार यांनी तेरावा होण्यापूर्वीच शपथविधीचा कार्यक्रम उरकून घेतला
दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कुठेतरी कट शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली असे मला वाटते, खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धारून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे, कदाचित भाजपाच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी विकसित भारताकडे दमदार पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा ९८,३०६ कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, १२,३५५ कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे १ लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असा विश्वास …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्नं होणार पुर्ण शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प शेती व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास वाटतो. कृषी बजेट वाढवून सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत देण्यात आले असून …
Read More »अजित पवार यांच्या अस्थीकलश पूजनावेळी सुनिल तटकरे म्हणाले, दादांनी दिलेला विचार घेऊन… कुणाला आमच्यावर आरोप करायचे आहे त्यांना करु दे, आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादांनी पक्षाचा परिवार उभा केला त्या निर्णयाशी सुसंगत
आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केली नाही. कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष… दादांनी दिलेला विचार …घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहिल आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने… कृषी, मध्यम, छोटे व लघु उद्योग, शेतकरी यांच्यासाठी काहीच नाही; रोजगार निर्मितीसाठी ठोस योजना नाही
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मागील अर्थसंकल्पापेक्षा काहीही वेगळा नाही. हा अर्थसंकल्प कोणत्याही समाजघटकाचे समाधान करणारा नसून केवळ मोठे आकडे आणि दावे मांडण्यापुरताच मर्यादित आहे. अर्थसंकल्पात आकड्यांची जुमलेबाजी करण्यात आली असून तो पूर्णतः दिशाहीन आहे, अशी तीव्र टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. पुढे बोलताना हर्षवर्धन …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय. वंचित घटक गायब अर्थसंकल्पातील तरतूदींवरून केली टीका
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘पोकळ दावे’ असल्याचे केले. सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाला ‘केवळ श्रीमंतांसाठी असलेला …
Read More »
Marathi e-Batmya