राजकारण

नाना पटोले यांची मागणी, बीडमध्ये दोन वर्षात ३२ हत्या, उच्च न्यायालयाच्या मार्फत चौकशी करा सरकारला अधिवेशनात जाब विचारु, सरकारने पळ काढू नये

नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरु नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर …

Read More »

महायुतीच्या या ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्री तर ६ आमदारांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ भाजपा आणि शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी

हिवाळी अधिवेशन आणि नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर आज राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. आज रविवारी संध्याकांळी ४ वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. यावेळी तिन्ही पक्षाचे मिळून ३३ आमदारांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली. तर ६ राज्यमंत्री पदाचा शपथ देण्यात आली. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना …

Read More »

अजित पवार म्हणाले, जितका मोठा गुच्छ-हार तितका मोठा…अडीच वर्षे मंत्री पद नागपूर शहरात विदर्भ आणि नागपूरसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ; अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन...

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज करण्यात येत आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारा आधी नागपुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज नागपूरात मेळावा घेण्यात आला. तसेच नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटनही केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, हल्ली भला मोठा हार नाहीतर गुच्छ आणून अभिनंदन करण्याची पद्धत सुरु आहे. …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, …हे कोणत्या कायद्यात बसते? माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा

मागील तीन-चार दिवसांपासून संसदेत राज्यघटना स्विकारण्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेचा पहिला टप्पा लोकसभेत काल पुर्ण झाला. राज्यसभेत उद्यापासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत …

Read More »

शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार

शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत प्रथेप्रमाणे राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे शिवसेना उबाठाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. नागपूरात उद्या सोमवारपासून …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी या आमदारांना निरोप भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेच्या या आमदारांना फोन

राज्य सरकारने मुंबईतील तीन दिवसीय विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करून दाखविल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ४ वाजता नागपूरातील राजभवनात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात तिन्ही पक्ष अर्थात भाजपा, अजित पवार यांचा …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पलटवार, देशात तेव्हा इलेक्टड नव्हे तर सिलेक्टड सरकार… पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावरही टीका

राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात काँग्रेसचे नेत्या प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाने केलेल्या राजकिय चुकांवर भाष्य करत लोकशाहीचा ढाचा प्रयत्न भाजपावर हल्लाबोल केला. तसेच विरोधी बाकावरील इतर नेत्यांनीही भाषण करत राज्यघटना आणि देशातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावर ताशेरे ओढले. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

संसदेत राष्ट्रवादीने अदानीच्या मुद्यावरून काँग्रेसची साथ सोडली राष्ट्रवादीची अदानी प्रकरणावरून काँग्रेसपासून दुसऱ्यांदा वेगळी भूमिका

संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेत सध्या राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेवर विशेष चर्चा सुरु आहे. त्यातच राज्यसभेतही पदसिद्ध सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव इंडिया आघाडीकडून आणला आहे. तर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नुकतेच अमेरिकेने …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा खोचक टोला, भाजपाच्या राज्यात देवही ‘सेफ’ नाहीत… फक्त नरेंद्र मोदींचा लाडका मित्रच ‘सेफ’

भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत मंदिरांवरही बुलडोझर चालवला जात असून भाजपाचा हा विध्वंसक बुलडोझर आता श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी निघाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्यात देवही ‘सेफ’ नाहीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका मित्रच ‘सेफ’ आहे, असा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. यासंदर्भात संताप …

Read More »

शिवसेना उबाठाच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मंदिर हटविण्याचे आदेश मागे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश: दादर हनुमान मंदिर सुरक्षित

दादर पूर्व रेल्वे स्टेशन लगत साधारणतः ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वेच्या जागेवर असल्याने त्याला हटविण्याचे आदेश रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आले. त्या आदेशावरून नुकतेच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या मंदिर हटविण्याला विरोध दर्शवित हेच का भाजपाचं हिंदूत्व असा सवाल केला. तसेच आज या मंदिरात …

Read More »