संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेत सध्या राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेवर विशेष चर्चा सुरु आहे. त्यातच राज्यसभेतही पदसिद्ध सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव इंडिया आघाडीकडून आणला आहे. तर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नुकतेच अमेरिकेने भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही जारी केले. या मुद्यावरून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सातत्याने गौतम अदानीच्या विरोधात संसदेच्या आवारात आणि आतमध्ये हा मुद्दा लावून धरत आहे. मात्र अदानीच्या चौकशीच्या मुद्यावरून इंडिया आघाडीत विरोधाभास निर्माण होत होत आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कधीही उद्योगपती गौतम अदानी यांच्याबरोबर असलेले संबध कधीही लपविले नाहीत. तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत भाजपा नेत्यांच्या सोबत गौतम अदानी यांच्या घरी बैठक घेण्यात अजित पवार यांच्यासोबत अदानीच्या घरी उपस्थित होते ही बाब अजित पवार यांनीच उपस्थित केली.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार यांनी नेमकी काँग्रेसच्या भूमिकेच्या विरोधी भूमिका मांडत गौतम अदानीच्या प्रश्नापेक्षा राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि तरूणांच्या बेरोजगारीबाबत संसदेत चर्चा व्हायला हवी अशी भूमिका मांडत अदानीच्या मुद्यावरून राष्ट्रवादी अलिप्त असल्याचे एकप्रकारे दाखवून दिले.
लोकसभेत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यघटनेत संसदेला अनन्य साधारण महत्व दिले आहे. दुर्दैवाने संसदेतील कोणत्या राजकिय नेत्याचे कोणत्या उद्योगपतीशी संबध आहेत. किंवा वैयक्तिक टीपण्णी केल्याने बऱ्याचदा संसदेचे कामकाज थांबते. कोणता नेता कोणाच्या विमानात बसून कुठे गेला, किंवा कोणत्या परदेशातील नेत्याने स्थानिक नेत्याला देणगी दिली. यापेक्षा देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि तरूणांचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत की नाही हे मुद्दे महत्वाचे आहे. आम्हाला देशाच्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा हवी आहे. फक्त राजकिय घोषणा नको असे सांगत सरकार आणि विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे अशी भूमिका मांडली.
पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे तरूणांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत असे सांगत तरूण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूमिका मांडली.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मांडलेल्या भूमिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडत काँग्रेसला एकाकी सोडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यापूर्वी हिंडनबर्गच्या अहवालावरून काँग्रेसने संयुक्त सांसदीय समितीच्या मार्फत अदानी प्रकरणाची चौकशी लावून धरली होती. तसेच संसदेत सातत्याने काँग्रेसकडून तशी मागणीही करण्यात येत होती. मात्र ऐनवेळी एनडीटीव्ही या अदानीच्या वृत्त दूरचित्रवाणीला मुलाखत देत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसने मागणी केलेल्या भूमिकेऐवजी संयुक्त सांसदीय समितीच्या चौकशीच्या मागणीला विरोध दर्शवित न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्ती मार्फत चौकशीची मागणी केली.
त्यामुळे गौतम अदानी यांच्याबाबत जेव्हाही काँग्रेसकडून मुद्दा उपस्थित करत किंवा तो लावून धरण्याचा प्रयत्न करत, त्या त्या वेळी शरद पवार हे काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत आला आहे.
दाल में कुछ काला है…!#संविधान_सन्मान_चर्चा #Parliament #WinterSession #Constitution #Democracy #India #AmolKolhe #Maharashtra@TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat @LoksattaLive @News18lokmat @lokmat @LokshahiMarathi… pic.twitter.com/kxGkLDMvhN
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 13, 2024
Marathi e-Batmya