शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार

शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत प्रथेप्रमाणे राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे शिवसेना उबाठाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली.

नागपूरात उद्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी राज्य सरकारकडून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार विरोधकांकडून टाकण्यात आला. तत्पूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर रविभवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ईव्हीएमच्या आधारावर हे सरकार आलं आहे. सोयाबीन, कापसाला भाव न देणारं हे सरकार आहे, दुधाचे भाव घसरलेले हे सरकार आहे. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणारे हे सरकार आहे. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या हे सभागृहात जोरदर ताकदीने मांडणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.

अंबादास दानवे यापुढे बोलताना म्हणाले की, परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर उमटलेल्या पडसादानंतर झालेल्या कोंबिग ऑपरेशन दरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सोमवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला. अशा सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री हे मिरवणुकीत गुंतले आहेत, अशी उपरोधिक टीकाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले की, यावेळी बोलताना सरकारला सवाल करत म्हणाले की, सरकारचे या सर्व घटनांकडे लक्ष आहे की नाही, असा सवाल उपस्थित करत नवीन सरकार आल्यानंतर मुख्यंत्री पद विदर्भात आले. त्यानंतर तीन आठवड्याचे अधिवेशन असेल, ही वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती. विदर्भातील जनतेची अपेक्षा होती त्याला हरताळ फासला गेला अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सोयाबीनला हमीभाव नाही, धानाला भाव नाही, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी अपेक्षा होती. हे अधिवेशन अधिक कालावधी साठी चालवावे, अशी मागणी केली.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांचे प्रेत नासवण्याचे काम हत्येकऱ्यांनी केल्याचा आरोप ही केला. सोयाबीन खरेदी केंद्र अजून सुरू झाले नाही. शेतकरी कर्जमाफीची भूमिका सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी केली.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ नेते जितेंद्र आव्हाड, आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार महेश सावंत, आमदार ज.मो. अभ्यंकर उपस्थित होते.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *