मराठवाड्यात कुणबी-मराठा किंवा मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहिर

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या लढ्याला आज अखेर यश मिळाले. निझाम राजवटीच्या अखत्यारित असलेल्या मराठवाडयातील मराठा समाजाला कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी असे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाच्या मागणीनुसार अखेर राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला.

राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार निझाम राजवटीखाली असलेल्या भागातील कुणबी समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत. तसेच कुणबी समाजाला कापू असे संबोधण्यात येत होते. तसेच या समाजाचा प्रमुख व्यवसाय हा शेती होता. त्याचबरोबर विद्यमान स्थितीत या समाजाच्या नागरिकांना मराठा म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील निझाम राजवटीखालील भागातील मराठा समाजाच्या सर्वांना कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे.

मराठा समाजाला अशा स्वरूपाचे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी स्थानिक पातळीवर गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच गॅझेटीयरमधील नोंदीनुसार मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्याला प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जो व्यक्ती भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेत करणाऱ्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास आणि १३-१०-१९६७ पूर्वी तो किंवा त्याचे पुर्वज संबधित क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञा पत्र सादर करावे.

या प्रतिज्ञा पत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम अधिकाऱ्याकडून स्थानिक पातळीवर चौकशी करावी अशा चौकशीमध्ये संबधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील-कुळातील नाते संबधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबधातील-कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञा पत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद दाव पातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील असे स्पष्टपणे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.

त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाच्या व्यक्तीस कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी असे जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने जारी केलेला हाच जो शासन निर्णयः-

 

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *