द साबरमती रिपोर्टवर चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बनावट… एका युजरच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली प्रतिक्रिया

गुजरातमधील ग्रोधा हत्याकांड आणि साबरमती येथील दंगलीच्या घटनांवर तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्यासह अन्य नेत्यांवरील आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर या घटनांवर आधारीत द साबरमती रिपोर्ट नामक एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एका युजरने नुकतेच पंतप्रधान मोदी यांना टॅग करत विचारले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

एक्स माध्यमावरील विक्रांत भट नावाच्या युजरने चित्रपटाबद्दल स्वतःचे विचार मांडत त्याविषयीची पोस्ट एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टला एक्सवरच उत्तर देत म्हणाले की, बनावट कथानक फक्त काही काळापुरते टीकते. त्यानंतर घटनेतील सत्य बाहेर येते. तुम्ही अतिशय योग्य म्हटलेले आहे. त्या घटनेतील सत्य बाहेर येत आहे. हे चांगलेच झाले. तसेच सर्वसामान्यांनाही याची माहिती होईल असे सांगत एकप्रकारे चित्रपटाचे प्रमोशन केल्याचे दिसून येते.

साबरमती येथे घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या द साबरमती रिपोर्ट चित्रपटात विक्रांत मेसी याने प्रमुख भूमिका केली आहे.हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. अलिकडच्या इतिहासातील घटनेमागील खरे सत्य या निमित्ताने बाहेर आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा विषय अतिशय संवेदनशीलतेने हाताळला आहे. या दुर्घटनेत ५९ जणांचा बळी गेला असून आज त्यांना योग्य पद्धतीने श्रध्दांजली लाभल्याचे मतही या विक्रांत भट नामक युजरने व्यक्त केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रावर आधारीत नरेंद्र मोदी चित्रपट असो किंवा केरळमधील धर्मनिरपेक्षतेला गालबोल लावणारा द केरला डायरीज आणि जम्मू आणि काश्मीरमधील हिंदू पंडितावर झालेल्या अत्याचारावरील द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे प्रमोशन अशाच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या प्रमोशनमध्ये आता या आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *