दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज रविवारी मनसे कार्यकर्त्यांचा आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, २०१८ साली मी निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी ईव्हीएम मशिन्सबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु त्यावेळी कोणी आपल्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या कामजा पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विधानसभा निवडणूका झाल्यानंतर जे जिंकून आले त्या सत्ताधारी पक्षाचे उमेदवार शॉकमध्ये गेले. कारण महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसविले असल्याचा आरोप केला.
गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वरील आरोप केला. तसेच सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाला मतदार यादी “तपासणी” करण्याची आणि सर्व राजकीय पक्षांच्या “समाधान” पर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे न घेण्याची मागणी केली.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या बूथ-स्तरीय एजंट्सच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले: “जर मतदार यादीत फेरफार करून निवडणुका घेतल्या गेल्या तर तो मतदारांचा सर्वात मोठा अपमान आहे. तुम्ही मतदान करा किंवा करू नका, सामना निश्चित आहे असा इशारा दिला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला कळले आहे की येत्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ९६ लाख बनावट मतदारांची मतदार यादीत नोंद झाली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही त्यांनी हे केले होते, असा आरोपही निवडणूक आयोगावर केला.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईत ८ ते १० लाख आणि ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये ८ ते ८.५ लाख बनावट मतदार जोडले गेले आहेत. अशाच पद्धतीने राज्यातील अनेक लहान-मोठ्या शहरात खोटे मतदार घुसविल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील अंकगणित मांडत आता ते असे म्हणत टीका करत आहेत की फलाना एकही जागा जिंकली नाही. सर्वांना माहिती आहे असे सांगत शिंदे गटाच्या एका आमदाराने जाहिर कार्यक्रमातच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगितले की बाहेरून २० हजार माणसे कशी आणली तसेच त्याचा व्हिडीओही यावेळी दाखविला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील एका जाहिर सभेत बोलताना निवडणूक प्रक्रियेबद्दल काय भाष्य केले होते त्याचाही व्हिडिओही यावेळी राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात दाखविला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, २३२ आमदार (महायुतीचे) निवडून आले तेव्हाही महाराष्ट्र शांत होता. मतदारांना धक्का बसला आणि निवडून आलेले प्रतिनिधीही स्तब्ध झाले. आता सर्वांना माहिती आहे की या गणनेत निवडणुका कशा घेतल्या जातात…
रॅलीदरम्यान, राज ठाकरे यांनी मोदींची मागील वर्षांची व्हिडिओ क्लिप देखील दाखवली, ज्यामध्ये मोदींनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. मी जे म्हणत आहे तेच मोदींनी स्वतः एकदा म्हटले होते. आम्ही आज निवडणूक आयोगाला सांगत आहोत की त्यांनी असे करू नये. जेव्हा भाजपा विरोधी पक्षात होता, तेव्हा ते निवडणूक आयोगावर असेच आरोप करायचे, याची आठवण करून देत भाजपा नेतृत्वावर टीका केली.
शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मतदार यादीतील गोंधळ ही काही नवीन गोष्ट नाही… ती वर्षानुवर्षे सुरू आहे. मी २०१६-१७ मध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya