सांगलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ‌संगीता पाटील यांची निवड पाटील यांना ३४ मते; महाविकास आघाडीला मिळाली संख्याबळापेक्षा अधिकची ४ मते

‘क्या बडा ? तो दम बडा’ ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक मी गाव नाही आणि सर्वांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही!’असा डायलॉग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी एका मुलाखतीत हाणला होता. जयंत पाटील यांचा हा डायलॉग सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खरा ठरला आहे.

सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत, जयंत पाटील यांच्या राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडीला संख्याबळापेक्षा ४ अधिकची मते मिळाली आहेत. त्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या ऑपरेशन लोटसचा पार धुव्वा उडाला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतील संख्याबळ

जिल्हा परिषद निवडणुकीत १७ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला होता तर त्याच्या खाली १६ जागा जिंकत भाजप दोन नंबरचा पक्ष ठरला होता. त्यानंतर काँग्रेसला ११, शिवसेना (शिंदे गट) ७, राष्ट्रवादी (अजित पवार) ६, तर शिवसेना (उबाठा) १ असे संख्याबळ होते. त्यामुळे बहुमतासाठी फक्त एका जागेची कमतरता होती. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी भाजपाचाच माणूस बसेल असे वक्तव्य भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आले होते. मात्र जयंत पाटील यांच्या शांत आणि संयमी राजकीय खेळीने महायुतीला धक्का दिला आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)घ्या ४ सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले तर शिवसेना (शिंदे गट)चे दोन सदस्य गैरहजर राहिले.

मॉडेल स्कूल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजना ठरल्या गेमचेंजर

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना जयंत पाटील यांनी जिल्ह्यात मॉडेल स्कूल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यात आला होता. ही योजना सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत गेमचेंजर ठरली !

प्रतिक जयंत पाटील यांचे युवा कनेक्शन कामी आले

सांगली जिल्ह्यातील राजकारणात युवकांची मते ही निर्णायक आहेत तसेच निकालात महत्त्वाची भूमिका बजावतात. या युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने मतदान करण्यात प्रतिक जयंत पाटील यांचे युवा कनेक्शन कामी आले. प्रतिक जयंत पाटील यांनी युवा बैठका, युवा संवाद , मेळावे घेत सर्व युवकांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *