संजय राऊत यांनी नवा व्हिडीओ ट्विट करत, ” मकाऊ की रातें,… “

काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चीनमधील मकाऊ येथील परदेशी दौऱ्यावर गेले होते. त्या दौऱ्या दरम्यानचा एक फोटो संजय राऊत यांनी ट्विट करत हिंदूत्वाचे शिलेदार कॅसिनो खेळत आहेत. ते काहीही करू शकतात अशी त्यात टीपण्णी करत ३.५ कोटी रूपये उडविले असा आरोप केला. परंतु ट्विट करताना कोणाचेही नाव घेतले नाही. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपण मकाऊ येथे कुटुंबियांसमवेत गेलो असल्याचे सांगत हॉटेलबाहेरचे काही फोटो ट्विट केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही सारवासारव करत मॉर्फ केलेला फोटो अशी उपरोधिक टीका केला.

त्यानंतर संजय राऊत यांनी आज त्याच हॉटेलमधील एक व्हिडिओ ट्विट करत ” मकाऊ की रातें, पिक्चर अभी बाकी ” असे सूचक विधान करत चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाला गर्भित इशारा दिला.

तसेच आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, मकाऊ दौऱ्यातील २७ फोटो आणि ७ व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगितले.

याशिवाय संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, महाराष्ट्रात नावा आधी पदव्या लावण्याची प्रथा नाही. हिंदूत्वासाठी काम करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे काम पाहून आम्ही शिवसेनेत सहभागी झालो. पण गद्दारांनी काय काम केले हे तपासावे लागेल. म्हणे, गद्दारांनी त्यांच्या नेत्याच्या नावा आधी हिंदू हृदयसम्राट अशी उपाधी लावली. गद्दारांनी हिंदूत्वासाठी काय काम केले हे तपासावे लागेल असे सांगत हिंदू हृदयसम्राट एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असेही स्पष्ट केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *