अमोल किर्तीकर म्हणाले, मी माझ्या वडीलांना माझा निर्णय सांगत…

शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्धार केला आहे. आज सकाळी प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेत अमोल किर्तीकर यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना अमोल किर्तीकर म्हणाले, वडिलांनी शिंदे गटात जाण्याच्या घेतलेला निर्णय त्यांचं वैयक्तिक मत आहे. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत असून, माझा निर्णय वडिलांना सांगितला आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर कायम राहणार आहे. मात्र, वडिलांपासून विभक्त होणार नाही, असे स्पष्ट केले.

गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेत आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. अमोल किर्तीकर म्हणाले, माझ्या जन्माच्या आधीपासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु आहे. त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. राजकारणातील वादविवाद घरापर्यंत येऊ नये, असं माझं मत आहे. वडिलांच्या निर्णयाशी असहमत असल्याने आदित्य ठाकरेंबरोबर आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी काम करेन, अशी ग्वाहीही यावेळी दिली.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा टँकर हा अंतिम पर्याय; जलस्रोत बळकटीकरण, नाला खोलीकरण, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण योजना तातडीने कार्यान्वित करा

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *