महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारु दे लालबागच्या राजाकडे दादा-ताईंचे साकडे

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते.
अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी राज्य आज आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. बलात्कार,महिला अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती नीटनेटकी होवो अशी प्रार्थना राज्यातील जनतेच्या वतीने केली.

About Editor

Check Also

काँग्रेस पक्षाची २६ नोव्हेंबर रोजी ठाण्यात राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’ प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार..

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *