ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या गाण्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले…कदाचीत त्यांच्यासोबत जायंच असेल तर या दोघांच्या मध्ये बसून हो म्हणू का

लोकसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास बरोबर आज आठ ते दहा दिवस होत आहेत. तसेच पुढील तीन-चार महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूकाही जाहिर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीतील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेनना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आताच तयारीस सुरुवात केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक महायुतीतील घटक पक्षांपेक्षा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना जास्त फायदा झाला असून दिल्लीतील भाजपाच्या अजिंक्य अशा अवस्थेला रोखण्यात महाविकास आघाडीला चांगलेच यश आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेही झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे ही चांगलेच खुलल्याचे दिसून आले.

या पत्रकार परिषदेत भाजपा आणि महायुतीतील एकेकाळच्या सहकाऱ्यांबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्नांची बरसात उद्धव ठाकरे यांच्यावर सुरु केली. त्यावेळी खुललेले उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, “कदाचीत तुम्हाला माहित नसेल की ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे एक प्रसिध्द गाणे आहे. ते गाणे अनेकांना कदाचित माहित नसेल. पण पवार साहेब (शरद पवार यांना उद्देशून) तुम्हाला नक्कीच माहित असेल, ‘जरी परिजात फुलाचे झाड माझ्या अंगणी…तरी फुले का पडती शेजारी’ “असे सांगत त्या गाण्याच्या प्रमाणे सध्या भाजपा आणि महायुतीतील पक्षांची झाली असल्याचा उपरोधिक टोलाही यावेळी विरोधकांना लगावला.

उद्धव ठाकरे यांना आणखी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी आणखी एक सवाल केला की, भाजपासोबत जाणार म्हणून, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, समजा मला जायचं आहे तर यांच्यात (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) बसून मी हो म्हणेन असे तुम्हाला वाटते का असे प्रतित्तुरही दिले. यावर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांमध्ये एकच हशा उडाला.

About Editor

Check Also

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *