वर्षा गायकवाड यांची मागणी , फ्रेंच कंपनी सिस्ट्राने एमएमआरडीएवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा पारदर्शक चौकशीसाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करा

भाजपा युतीच्या काळातील भ्रष्टाचाराचे विक्रम दररोज उघड होत आहेत. आता फ्रेंच अभियांत्रिकी कंपनी सिस्ट्राने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील (MMRDA) अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एमएमआरडीएवरील हे आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे मुंबईची जगभरात नाच्चकी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर खुलासा करावा व  आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई मेट्रो प्रकल्पांची रचना आणि देखरेख करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिस्ट्रा या फेंच्र कंपनीने, प्रकल्पाचा खर्च वाढवण्यासाठी एमएमआरडीने दबाव आणल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार धक्कादायक असून भ्रष्टाचाराचे हे प्रकरण फ्रेंच दूतावासापर्यंत पोहोचले आहे. याचा थेट फटका जागतिक आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईच्या विश्वासार्हतेला बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भ्रष्टाचाराची दखल घेऊन यातील जबाबदार व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. ही चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करावी. मुंबईवर भ्रष्टाचाराचा डाग लावणाऱ्यांना कठोर शिक्षा नाही झाल्यास मुंबईचा आणि मुंबईकरांचा विश्वासघात होईल, असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा, आणि भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही या भाजपाच्या घोषणा इतर घोषणांसारख्या चुनावी जुमलाच ठरलेल्या आहेत. मोदानीच्या भ्रष्टाचाराचा फुगा अमेरिकेत फुटला आहे, त्यांच्यावर कारावाईची टांगती तलवार आहे. आता फ्रेंच कंपनीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने जगात भारताच्या नावाची बदनामी होत आहे. भाजपा युती सरकारने भ्रष्टाचार करुन मलई खाण्याचे काम केले आहे. फ्रेंच कंपनीने केलेल्या लाचखोरी व भ्रष्टाचाराच्या आरोपाने मुंबई व महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचा आरोपही यावेळी केला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *