विजय वडेट्टीवार यांचा आरोप, कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा याचा चौकशी अहवाल अधिवेशन संपण्याच्या आत सभागृहात मांडा

सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली. एका व्हॅनची किंमत चाळीस लाखाच्या वर होऊ शकत नाही. या व्हॅन मधील यंत्र ही बारा लाखाच्या किंमतीपेक्षा अधिक नाही. अस असताना वाहने खरेदी करताना अधिकच्या किंमतीने घेण्यात आली आहेर. कॅन्सर सारखा जीवघेणा आजार आहे त्याच्या संबंधित व्हॅन आहेत, त्यातील काही यंत्र बंद पण पडली आहे. या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे याबाबत चौकशी सुरू आहे अजून अहवाल देखील आला नाही मग नेमकी काय सुरू आहे? असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, अधिवेशन संपण्याच्या आत हा अहवाल सभागृह समोर मांडला पाहिजे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी चौकशी अधिवेशन संपण्याच्या आत पूर्ण करून अहवाल सदना समोर मांडवा अशी मागणी केली.

About Editor

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *