मागील काही महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक हितसंबध असल्याचीही माहितीही पुढे आली. त्यातच भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात आका आणि आकाचा आका म्हणून एकच आघाडी उघडली. मात्र याप्रकरणी राज्य सरकारकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही घेतला नाही. त्यातच धनंजय मुंडे यांची भेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली.
त्यासंदर्भातील माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनीच सविस्तर दिली. परंतु सुरेश धस यांनी या भेटीची बातमी कोणी लीक केली आणि का केली असे सांगत याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नावासह करणार असल्याचे जाहिर केल्याने सुरेश धस नेमकी कोणाची तक्रार करणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सध्या राज्यात भाजपाची सत्ता असल्याने कोणती बातमी फोडायची आणि कोणती बातमी लपवून ठेवायची याची रणनीती भाजपाच्या सूत्रांना चांगलीच माहिती आहे. त्यानुसार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री तथा वाल्मिक कराड यांचे नेते धनंजय मुंडे यांची भेट झाली.
त्याचे वृत्त बाहेर आल्यानंतर यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता सांगितले की, मी प्रदेशाध्यक्ष असल्याने दोन्ही आमदारांची भेट घडवून आणली. माझ्या घरी धनंजय मुंडे हे आले होते त्यावेळी सुरेश धस हे ही आले. आम्हा तिघांमध्ये चार-साडेचार तास चर्चा झाली. दोघांमध्ये मनभेद नाहीत, पण मतभेद नाहीत. त्यामुळे त्या दोघांना त्यांच्यातील मतभेद मिटविण्यास सांगितल्याचेही यावेळी सांगितले.
तर सुरेश धस यांनी या बैठकीबाबत खुलासा करताना म्हणाले की, धंनजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी गेलो होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा वेगळा आणि प्रकृतीची विचारपूस वेगळी असे सांगत त्यावेळी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ही तेथे उपस्थित होते. साधारणतः आमच्यात अर्धातास चर्चा झाल्याचेही यावेळी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश धस यांच्या दोघांच्या बोलण्यातून जरी वेगवेगळे म्हणणे बाहेर आले तरी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याची माहिती कन्फर्म झाले.
तसेच सुरेश धस पुढे म्हणाले की, या बैठकीची माहिती पद्धतशीरपणे कोणी लीक केली किंवा कोणी बाहेर दिली त्याचे नाव मला माहित आहे. त्यामुळे त्या व्यक्तीची नावासकट तक्रार आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत राज्य सरकारने आरोपींना अटक करण्या व्यतिरिक्त आणखी अनेक गोष्टीत संधिग्धता बाळगली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील घोटाळ्याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेल्या कथित संबधावरून अद्याप राजीनामाही घेण्याचे धाडस दाखविले नसताना सुरेश धस नेमकी कोणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती लिक केली म्हणून करणार असा सवाल निर्माण झाला असून या माहितीची अतिरिक्त माहिती मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच प्रसारमाध्यमांना जास्तीची दिल्याने चंद्रसेखर बावनकुळे यांचीच तक्रार करणार का असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
Marathi e-Batmya