मंत्र्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूस मिळाली तातडीने मदत सुनिल केदार यांनी दाखविली तत्परता

नागपूर : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुभार्व रोखण्याकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हयातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु. ज्योती चव्हाण या खेळाडू समोर उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला व तिला कुटुंबाचा निर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या परिस्थितीत तिला क्रीडा कौशल्य टिकऊन ठेवण्याकरिता पोषक आहाराकरिता तातडीची मदत म्हणून नागपूर जिल्हा क्रीडा परिषद खात्यातून २५ हजार रुपयाचा धनादेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते देण्यात आला.
जिल्हयातील मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून सहभागी झालेल्या ज्या खेळांडूची आर्थिक स्थिती हलाकीची असून कोविड-19 मुळे उदरनिर्वाह करण्यास आर्थिक अडचण भासत आहे अशा खेळाडूंची माहिती संकलित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, उपसंचालक डॉ. सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम आदी उपस्थित होते.
धावपटू क ज्योती चव्हाण हीने वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स इटली-२०१९ मध्ये भारताकडून द्वितीय स्थान प्राप्त केले असून या स्पर्धेत ती ११ व्या स्थानी राहलेली आहे.

About Editor

Check Also

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनानिमित्त खास लेख

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *