काँग्रेसच्या नवनियुक्त लोकसभा, विधानसभा व जिल्हा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्षांच्या विभागवार बैठका बुधवारी मुंबईत ४ नोव्हेंबरला कोकण विभागाची तर गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक नाशिकला

काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्ष यांच्या विभागवार बैठका उद्यापासून घेण्यात येणार आहेत. कोकण विभागाची बैठक बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबरला काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई येथे तर उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक गुरूवारी ५ नोव्हेंबरला नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

या पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या कामाच्या अपेक्षा (SOP) प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. सर्व प्रभारींच्या कामाचा आढावा तीन महिन्यात घेण्यात येईल व त्यांनी केलेल्या कामाची समिक्षा करून प्रभारींच्या यादीमध्ये त्यानुसार फेरबदल करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन राज्यात अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियोजनबद्ध कामाची आखणी केली असून काँग्रेसला पुन्हा सोनियाचे दिवस आणण्याचा संकल्प केलेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

About Editor

Check Also

राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या प्रश्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळण्याकडे अनेक नेत्यांचा कल राष्ट्रवादीच्या विलनीकरणामागे भाजपाच्या हालचाली, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाह यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रीय राजधानीत ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यानंतर, भाजप एनडीए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *