विजापूरमधील इंद्रावती उद्यानात चकमक दोन सुरक्षा रक्षकासह ३१ माओवादी ठार सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमधील चकमकः हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान आणि ३१ माओवादी ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी सकाळी दिली. उद्यानाच्या एका विशिष्ट भागात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने त्या ठिकाणाकडे कूच केल्यानंतर ही चकमक झाली.

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक, सुंदरराज पी, यांनी पुष्टी केली की चकमकीत मारले गेलेले जवान हे जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि स्पेशल टास्क फोर्स (STF) – माओवादी विरोधी ऑपरेशन्समध्ये तज्ञ असलेल्या राज्यस्तरीय दलांचे होते असेही यावेळी सांगितले होते.
पुढे बोलताना अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, इतर दोन जवान जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारासाठी रायपूरला हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली असल्याचे सांगितले.

याआधी रविवारी सकाळी पोलिसांनी एका निवेदनात सांगितले की, माओवाद्यांच्या तळाजवल पोलिस पोहोचल्यानंतर रविवारी मधूनमधून गोळीबार झाला आणि गोळीबार सुरू राहिला. या गोळीबारात काही नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आमची शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.

इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये या वर्षातील ही दुसरी चकमक आहे, जिथे १२ जानेवारी रोजी तीन माओवाद्यांना ठार करण्यात आले होते.
अबुझमदला लागून असलेला राष्ट्रीय उद्यान परिसर माओवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे मानले जाते. २,७९९.०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या उद्यानाची सीमा महाराष्ट्राला लागून आहे आणि १९८३ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.

या वर्षी आतापर्यंतच्या चकमकीत ६२ माओवादी मारले गेले आहेत आणि छत्तीसगडमध्ये माओवाद्यांशी लढताना ११ जवानांनाही प्राण गमवावे लागले आहेत. या वर्षी माओवाद्यांच्या हल्ल्यात विजापूरमधील पाच नागरिकांसह किमान नऊ नागरिकांचा मृत्यू झाला.

About Editor

Check Also

व्हाईट हाऊस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली कोल टॉमस ॲलन कॅलिफोर्नियाचा, घटनेनंतर घेतले ताब्यात

व्हाइट हाउस कॉरेस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या डिनरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताची ओळख कोल टॉमस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *