सावरकरांनीच सांगितले गोमांस खाण्यात काही चूक नाही : काँग्रेस नेते दिग्विजय सिंग हिंदू आणि हिंदूत्वाचा काहीही संबध नाही

मराठी ई-बातम्या टीम

सावरकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. गाय असा प्राणी आहे की जो स्वत:च्या शेणात लोळण घेतो, ती आपली माता कशी काय असू शकते? गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही, असे सावरकरांनी सांगितल्याचा दावा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला.

त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा सावरकर प्रेमी आणि भाजपा नेत्यांकडून नवा वाद निर्माण केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ते भोपाळ येथील एका कार्यक्रमात बोलत होते. वास्तविक पाहता दिग्विजय सिंग हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. मात्र यावेळी त्यांनी थेट सावरकरांचेच वक्तव्य असल्याचे सांगत गोमांस खाण्यास काहीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मागील काही दिवसांपासून हिंदू, हिंदुत्व व सावरकर या मुद्य्यांवरून भाजपा व काँग्रेस नेत्यांची विविध विधाने समोर येत आहेत. अगदी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील सातत्याने हिंदुत्वावरून बोलल्याचे दिसून आले आहे. आता दिग्विजय सिंह यांनी देखील या संदर्भात विधान केलं आहे. शिवाय, सावरकरांबद्दलही त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचं दिसत आहे.

इथे असे देखील हिंदू आहेत जे गोमांस खातात आणि म्हणतात कुठे लिहिलं आहे गोमांस खाऊ नये आणि बहुतांश हिंदू जे आहे ते गोहत्येच्या विरोधात आहेत. स्वत: सावरकर, सावरकरांबद्दल भाजपाकडून बरच सांगितले जाते, त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही. स्वत: त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलं आहे की, हिंदू धर्मचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही आणि हे देखील लिहिलं आहे की, गाय असा प्राणी आहे की स्वत:च्या शेणात लोळण घेते, ती कशीकाय आपली माता होऊ शकते? आणि तिचं गोमांस खाण्यात काही चुकीच नाही, हे सावरकरांनी स्वत:च स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच, ही सर्व विधानं सावरकरांची असून यातील एकही वाक्य आपलं मत म्हणून आपण सांगत नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

About Editor

Check Also

राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापारी करारावरून पंतप्रधान मोदींना विचारले पाच प्रश्न व्यापारी करारावरून केंद्र सरकारवर केली टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारावरून केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आणि पुन्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *