तळीरामांसाठी खुशखबर: बीअर, दारू, वाईन आता घरपोच मिळणार ऑनलाईन विक्रीस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील महसूलात भर घालणाऱ्या दारू विक्रीला ऑनलाईन पध्दतीने विक्रीस परवानगी दिली असून आता घरबसल्या तळीरामांना दारू मिळणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सुरु करण्यात आलेली दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र  आता ऑनलाईन विक्रीस परवानगी दिल्याने तळीरामांची तहान आणि सरकारला महसूल या दोन्ही गोष्टी आता साध्य होणार आहे.
दारूची ऑनलाईन विक्री करण्यासाठी संबधित परवानाधारक दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच घरपोच दारू पोहोचविणाऱ्या व्यक्तीने तोंडाला ममास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र वाईन, बीअर आणि दारू ही एखाद्या व्यक्तीने त्यांची नोंदणी केली असेल तरच त्यास ती वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थात सदरच्या व्यक्तीने दुकानदाराकडे ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय आता थंड बसत्यात सुनेत्रा पवार यांच्याकडून आमदारांचे मत विचारण्याच्या गोष्टीचा केला इन्कार

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन प्रतिस्पर्धी गटांच्या विलीनीकरणाची शक्यता आता मावळल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *