राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय आता थंड बसत्यात सुनेत्रा पवार यांच्याकडून आमदारांचे मत विचारण्याच्या गोष्टीचा केला इन्कार

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन प्रतिस्पर्धी गटांच्या विलीनीकरणाची शक्यता आता मावळल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शनिवारी या विषयावरील पुढील चर्चेची शक्यता फेटाळून लावली. त्याच वेळी, उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आमदारांकडून विलीनीकरणाच्या शक्यतेबाबत कोणताही अभिप्राय मागितलेला नाही.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत त्यांचे मत विचारले होते. मात्र, शनिवारी त्यांनी या वृत्ताचे खंडन केले, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत स्तरावर या विषयावर चर्चा सुरू असल्याच्या सर्व अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आलेले हे पहिले अधिकृत खंडन आहे. तीन आठवड्यांपूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, या बैठकीला सुनेत्रा अजित पवार उपस्थित नव्हत्या.

त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी असा दावा केला होता की, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असतानाच दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा निर्णय निश्चित झाला होता आणि ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार होते.
तीन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या होत्या, “मला माहीत आहे की तुम्हाला एका वेगळ्या विषयाबद्दल उत्सुकता आहे, पण योग्य वेळ आल्यावर सर्व गोष्टी समोर येतील.” त्यांच्या या गूढ विधानामुळे पुन्हा एकदा विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते.

सुनेत्रा अजित पवार यांच्या या खंडनासोबतच, सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की, त्यांचे चुलत भाऊ अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, त्याच दिवशी विलीनीकरणाची शक्यताही संपली होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी हे आधीही सांगितले आहे आणि आता पुन्हा सांगणार नाही. विलीनीकरणाची चर्चा तेव्हा झाली होती जेव्हा माझे भाऊ हयात होते. तेव्हा तशी योजना आखली गेली होती. पण आता ते आपल्यात नाहीत, त्यामुळे माझ्यासाठी विलीनीकरणाचा विषय कायमचा संपला असल्याचे” स्पष्ट केले. तसेच या विषयावर त्या आता कोणतेही प्रश्न स्वीकारणार नाहीत.

About Editor

Check Also

काँग्रेससाठी अडचणीच्या ठरणाऱ्या सर्व मुद्यांचा बिलॉंगिगः अ जर्नी ऑफ लव्ह पुस्तकात उल्लेख काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जवळपास अडचणीच्या सर्व मुद्यांवर केले पुस्तकात भाष्य

सुमारे सहा दशकांपूर्वी, जानेवारीच्या एका थंड सकाळी त्या भारतात आल्या आणि त्यानंतरच्या महिन्यातच त्यांनी राजीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *