श्रीनगरमध्ये बाजारात दहशतवाद्यांकडून हॅण्ड ग्रेनेडचा स्फोटः १० जण जखमी सुरक्षा दलाची तातडीने घटनास्थळी घाव

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील पर्यटक स्वागत केंद्राजवळ रविवारी भरलेल्या रविवारच्या बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्याने किमान दहा जण जखमी झाले. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या एका सर्वोच्च पाकिस्तानी कमांडरला श्रीनगरच्या खानयार परिसरात सुरक्षा दलांनी ठार केल्याच्या एका दिवसानंतर, कडक सुरक्षा असलेल्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळ (टीआरसी) हा हल्ला झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिली.

या स्फोटामुळे दुकानदार बचावासाठी ओरडत होते आणि परिसरात घबराट पसरली होती. श्रीनगरच्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळ झालेल्या ग्रेनेड स्फोटात जखमी झालेले सर्व नागरिक आहेत, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

बाधितांची नावे खालीलप्रमाणे:

1. मिसबा ( वय १७)
2. अझान काळू (वय १७)
३. हबीबुल्ला रादर (वय ५०)
4. अल्ताफ अहमद सीर (वय २१)
५. फैजल अहमद (वय १६)
6. उर फारुख
७. फैजान मुश्ताक (वय २०)
८. जाहिद (वय १९)
९. गुलाम मुहम्मद सोफी (वय ५५)
10. सुमैया जान ( वय ४५)

स्फोटानंतर वैद्यकीय पथकांसह सुरक्षा दलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली आहे.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते “खूप अस्वस्थ करणारे” असल्याची भावना व्यक्त केली.

“गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यातील काही भागांमध्ये हल्ले आणि चकमकीच्या बातम्या येत आहेत. श्रीनगरमधील ‘रविवार बाजार’ येथे निष्पाप दुकानदारांवर ग्रेनेड हल्ला झाल्याची आजची बातमी अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. सुरक्षा यंत्रणेने हल्ल्यांचा हा वेग लवकरात लवकर संपवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून लोक कोणत्याही भीतीशिवाय आपले जीवन जगू शकतील,” जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर काही वेळानंतर बाजारातील दैनंदीन व्यवहार पुन्हा सुरु करण्यात आले.

About Editor

Check Also

२०२३ मध्ये मुंबई विमानतळावर व्हीएसआर व्हेंचर्सच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल जाहिर व्हीएसआर व्हेंचर्सच्या लियरजेट ४५एक्सआर विमानाचे अस्थिर लँडिंग

विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (AAIB) आपल्या अंतिम अहवालात असा निष्कर्ष काढला आहे की, सप्टेंबर २०२३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *