Breaking News

Tag Archives: आरोग्य मंत्री

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू राज्य सरकारकडून आदेश जारी

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, …

Read More »

डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसमवेत चर्चा कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आदेश

राज्यासह देशात डॉक्टरांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी …

Read More »

डॉ तानाजी सावंत यांचे आदेश, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करा रुग्ण रेफर प्रकरणांची समितीमार्फत पडताळणी करावी

यावर्षी पावसाचे वितरण असमान दिसून येत आहे. काही भागात कमी कालावधीत मोठा पाऊस होत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भातील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूर परिस्थितीत साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क असावे. त्यासाठी शहर, गावांमध्ये स्वच्छतेसह डास निर्मूलन मोहीम राबवावी. पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध …

Read More »

क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती

देशाला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. देशाच्या क्षयरोग मुक्तीच्या लढ्यात महाराष्ट्र राज्यही मागे नाही. राज्यातही क्षयरोग निर्मुलनाबाबत प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने ११ राज्यांमध्ये १८ वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये राज्याचाही समावेश आहे. लस घेण्यासाठी …

Read More »

१३ फेब्रुवारीला विशेष मोहीमः १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जंतनाशक गोळी

जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजार उद्भवण्याची शक्यता असते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याची मोहीम राबविली जाते. येत्या १३ फेब्रुवारीला ही विशेष मोहीम राबविली जाणार असून, १ ते १९ …

Read More »

Corona जे एन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा

राज्यात कोरोनाच्या Corona ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले आहे. Corona ‘जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक …

Read More »

प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूवरून विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग काँग्रेसच्या सदस्यांनी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी घेरले

गडचिरोली जिल्ह्यातील दोन आणि अकोला जिल्ह्यातील एक अशा तीन महिलांचे योग्य व वेळीच उपचार न मिळाल्याने प्रसूति दरम्यान मृत्यू झाल्यामुळे आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात प्रचंड गदारोळ झाला.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सर्व विरोधी सदस्यांनी निषेध करीत सभात्याग केला. विधानसभेचे नियमित कामकाज सुरु …

Read More »

आरोग्य व्यवस्थेवरून आमदार प्रणिती शिंदे आणि मंत्री सावंत यांच्यात खडाजंगी

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रूग्णालयांबरोबरच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात येत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडून ठोस उत्तर मिळण्याऐवजी अशा गोष्टींना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा सध्या …

Read More »

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत दूर्गम भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. या समितीकडून एक महिन्यात अहवाल मागवला जाईल, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य …

Read More »

महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारणार सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची घोषणा

रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. मंत्रालयीन दालनात महाड येथे रूग्णालय …

Read More »