Tag Archives: नरेंद्र मोदी

राज ठाकरे यांचा सवाल, २२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय 'NEET' पेपरफुटीने परत एकदा हे सिद्ध झालं, १० लाखांना पेपर विकत घेतला

केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे.  ‘NEET’  पेपरफुटीने परत एकदा हे सिद्ध झालं. ‘NEET’ चा पेपर १० लाख रुपयांना विकत घेतला गेला. आणि याची मुळं सापडली महाराष्ट्रात. अर्थात हे पेपरफुटीचं जाळं देशव्यापी आहे. यांत ‘NEET’ साठी तयार करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची सूचना आणि महाराष्ट्राकडून अंमलबजावणी राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर

दोन तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन खरेदी-सोने खरेदी करू नये आणि परदेशी दौरे न करण्याबाबतचे आवाहन देशातील जनतेला केले. त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने लगेच अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुरुवात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी …

Read More »

शरद पवार म्हणाले की, मोदी यांनी सर्वपक्षिय बैठक बोलवावी पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांमुळे अस्वस्थेचे वातावरण

मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण ही मोदी भाजपाची स्थिती पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल, स्वतः ऐशोआरामात राहून जनतेला काटकसरची आवाहन

राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार सुरक्षेच्या नावाखाली मोठमोठे ताफे घेऊन फिरत आहेत. सरकारी व्यवस्थेची आणि जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि व्यवस्था विक्रीच्या मार्गावर नेल्या गेल्या असून, सर्व राज्यांवर ताबा मिळवण्याचे राजकारण सुरू आहे. पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने देशाचा नकाशा जाहीर करून …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिले लाल बहादूर शास्त्री यांचे उदाहरण इंधन खरेदी- सोने खरेदी नको, परदेशी प्रवास नको असे आवाहन मोदी यांनी केल्यानंतर सांगितली आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर राहुल गांधी यांची टीका हे सगळे अपयशाचे पुरावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या या आवाहनाला त्यांनी ‘अपयशाचा’ पुरावा म्हटले आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, “काल मोदीजींनी जनतेला त्याग करण्यास सांगितले—सोने खरेदी करू …

Read More »

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा खोचक सवाल, यात मोदीजी येतातच कुठे ? सोमनाथ मंदिर : कल्पना सरदार पटेल यांची, कृती मुन्शी-गाडगीळांची, आशीर्वाद प्रसादांचा

सोमवार दि. ११ मे रोजी गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार / पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ७५ वर्षांपूर्वी, गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते.  अधिवेशनादरम्यान एका सायंकाळी वेरावळ येथील कार्यक्रमात सोमनाथ मंदिरावर अनेकदा झालेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करत सदर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा मानस सरदार पटेल त्यांनी व्यक्त केला.  इतकेच नव्हे तर …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आशिष शेलार यांचा परदेश दौरा केला रद्द सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा कान्स दौरा रद्द

  देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा टोला, त्याग व काटकसर मोदींनीव स्वतःपासून करावी पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांनीही गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘त्याग’ करण्याच्या उपदेशापेक्षा नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करावे देशावरील संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा व बेफिकीरवृत्तीचा परिपाक, देश चालवण्यात ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश दणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त …

Read More »