महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत …
Read More »बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत शासकिय संगणक प्रणालीमध्ये अधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक
बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे. या प्रकरणी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी …
Read More »राज्यात रस्ते अपघातातील मृत्युदरात घट परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश
महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्युदरात घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले असून, त्यामध्ये १४,०६६ अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत …
Read More »परिवहन विभागाचे आवाहन, बनावट वेबसाइट्स, अॅप, खोट्या ई-चालान पासून सावध राहा फसवणूकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाचे आवाहन
राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. परिवहन …
Read More »आमदार रईस शेख यांनी परिवहन विभागाला अॅग्रीगेटर्स मसुदा नियमांमध्ये सुचवल्या सुधारणा कामाचे तास चालकांच्या उत्पन्नासाठी वाढवा, प्रवाशांना राईड रद्द करण्यासाठी ठराविक कालावधी द्यावा
चालकांना इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) रूपांतरण खर्चावर २५ टक्के अनुदान असावे आणि त्याचा पुरवठा चालक कल्याण निधीतून करावा, अशी सूचना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मोटार वाहन अॅग्रीगेटर्स नियम, २०२५ च्या मसुद्यावर राज्य परिवहन विभागाला पत्र लिहून केली आहे. परिवहन विभागाने ९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भामला मसुदा नियम प्रकाशित …
Read More »२५ पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच ‘एचएसआरपी’ विनाशुल्क बसविण्याचा परिवहन विभागाचा निर्णय
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) उत्पादक निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना, सोसायटी येथे शिबिर आयोजित करू शकतात. एका ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांनी निवासस्थानी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा निवासी कल्याण संघटना, सोसायटीमध्ये वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची एकत्रित बुकिंग केल्यास कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क …
Read More »२ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “परिवहन भवन” चे भुमिपुजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या ” परिवहन भवन ” या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी …
Read More »येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून “स्कूल बसेस” साठी नियमावली लागू करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप …
Read More »शिकाऊ व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या तारखेत बदल
परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहन चालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी व …
Read More »आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी
आरटीओ अर्थात परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही …
Read More »
Marathi e-Batmya