Tag Archives: भाजपा

आशिष शेलार यांचा आरोप, दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सज्जड पुराव्यांनिशी केला मविआच्या असत्यकथनाचा भांडाफोड

राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना आशिष शेलार …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, बिहार निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए)च्या विरोधात मतदान करा रशियाच्या तेलाचा फायदा सरकारला नाही, तर अंबानीच्या खासगी कंपनीला

आरएसएस-भाजपाला देशाचे संविधान बदलयाचे आहे. देशाला वाचवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि पेरियार स्वामी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आम्ही या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए) युतीच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी …

Read More »

राहुल गांधी यांची टीका, पंतप्रधान मोदी अदानी अंबानीसाठी नाचतीलही पण निवडणूका झाल्यानंतर मात्र ते परत येणार नाहीत

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आणि ते मतांसाठी “नाटक” करत असल्याचा आणि निवडणुकीनंतर दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याचा आरोप केला. बिहारमधील बेगुसराय येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी लोकांचे ऐकत नाहीत आणि निवडणुकीनंतर “गायब” होतात. राहुल …

Read More »

मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांचा महाविकास आघाडी वर घणाघात आपण जिंकलो तर लोकशाही... आणि हरलो तर मतचोरी हा दुटप्पीपणा - आमदार अमीत साटम

कोविडच्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी आणि खोटेपणावर पडदा टाकण्यासाठी ‘मतचोरीचा रडिचा डाव’ साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पराभव नजरेसमोर दिसताच, हा तथाकथित ‘सत्याचा मोर्चा’ काढून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचे यावरून स्पष्ट होते. अ’सत्याची’ आरोळी कितीही मोठी असली, तरी ‘सत्य’ कधीच …

Read More »

रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा ‘मविआ’ चा कट उधळून लावा मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण …

Read More »

अजित पवार यांची मुरलीधर मोहोळ आणि संदिप जोशी यांच्याबाबत मांडली भूमिका निवडणुकीत कोणी राजकारण आणू नये, खिलाडूवृत्ती हवी; खेळाडूंवर क्रीडामंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले. अजित पवार म्हणाले की, सन २०१३ पासून आपण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ह्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा!

कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे, त्यात संवदेना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार; अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारुन वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील काय? असा सवाल शिवसेना …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, फडणवीसांच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

किमान आधारभूत किमतीने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू ऑनलाइन ॲपद्वारे व खरेदी केंद्रावर नोंदणी राज्यस्तरीय तीन नोडल संस्थांची नियुक्ती

सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू होत असून कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. एमएसपीनुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ,” …

Read More »

राहुल गांधी यांचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद न्यायाच्या लढाईत पाठीशी असल्याचे दिले आश्वासन-हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी …

Read More »