Tag Archives: मुंबई पोलिस

कुर्ला येथील उद्यानात काही मुलांकडून जोडप्याला मारहाण पोलिसांकडून आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले

मुंबईतील एका सार्वजनिक उद्यानात एका जोडप्याला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर, पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळील एका बागेत घडली. हे अल्पवयीन मुले कथितरीत्या अश्लील टिप्पणी करत होती, ज्या वेळी संबंधित जोडपे फोटो काढत होते. जोडप्याने याला …

Read More »

अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी आणखी दोघांना पोलिसांकडून अटक आरोपींची संख्या १० वर हरियाणातील सोनिपत येथून अटक

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी हरियाणातील सोनीपत येथून जतिन नावाच्या १० व्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला अधिकृतपणे अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जतिनने या हल्ल्यासाठी शस्त्रे उपलब्ध करून दिली होती, असा आरोप आहे. जतिनच्या आधी, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातून अटक केलेले आदिवासी विद्यार्थी व NSUI अध्यक्षांना तत्काळ सोडा अन्यथा… मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांना अटक करणे हुकूमशाही, भाजपा सरकारची दंडेलशाही काँग्रेस सहन करणार नाही

नाशिकपासून मुंबईत लाँगमार्च करत आलेल्या व दादरच्या काँग्रेस कार्यालयात रात्री विसावा घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अटक करणे भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा प्रकार आहे. मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरजच काय, पोलिसांनी विद्यार्थ्यांसह NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके व मुंबई NSUI चे अध्यक्ष प्रद्युम यादव यांची तत्काळ सुटका करावी अन्यथा काँग्रेसचे राज्यातील …

Read More »

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी नवी माहिती समोर, साहिल तणावात होता साहिलशी बोलणारी ती शेवटची व्यक्ती

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात एक नवीन बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेने (Crime Branch) त्याच्या एका मित्राचा जबाब नोंदवला आहे; पोलिसांच्या मते, साहिलशी फोनवर बोलणारी ती शेवटची व्यक्ती होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्या मित्राने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, संभाषणादरम्यान साहिलने त्याच्या ‘थर्मोडायनामिक्स’ (Thermodynamics) परीक्षेबद्दल चर्चा केली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मनोज जरांगे यांच्या १४ पैकी १२ मागण्या मान्य यापूर्वीही आंदोलन केलेय आताही ते आंदोलन करू शकतात

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आंदोलन केलेली आहेत. यापुढेही ते करू शकतात. त्यांनी दिलेला अर्ज पोलिसांनी फेटाळून लावला आहे. त्यांचा दुसऱ्यांदा अर्ज आल्यानंतर पोलिसच त्यावर निर्णय घेतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या १४ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केली असल्याचे स्पष्ट केले. …

Read More »

मुंबईत साध्या वेषातील पोलिसाकडून आंदोलक महिलेशी गैरवर्तनः पोलिसांकडून मात्र सारवासारव पुरुष आंदोलकाला रोखण्याच्या नादात म्हणे महिला मध्ये आली

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेला एक साध्या वेषातील पोलीसाने आंदोलनादरम्यान एका महिलेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने पकडून रोखण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत असून यासंदर्भात विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून यासंदर्भात आवाज उठवताच पोलिसांनी मात्र दावा फेटाळून लावला. पोलिसांनी स्पष्ट केले की, तो पोलीस एका पुरुष आंदोलकाला रोखण्याचा प्रयत्न …

Read More »

मुंबईत पोलिसाची विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या पुढ्या खिशात ठेवून अडकविण्याची धमकी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आणि आपकडून टीका

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुंबईत झालेल्या नाट्यमय विद्यार्थी आंदोलनानंतर आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, पोलिसांच्या व्हॅनमध्ये चित्रित केल्याचा दावा असलेला एक व्हिडिओ मोठ्या वादाला तोंड फोडले. या क्लिपमध्ये एक पोलीस चालक ताब्यात घेतलेल्या विद्यार्थी आंदोलकांना, जर त्यांनी पुन्हा आंदोलन केले तर त्यांच्यावर खोटे ड्रग्जचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देताना …

Read More »

मुंबईतील मोहरमच्या मिरवणूकीत विषाने भरलेल्या कॅप्सुलच्या माध्यमातून, मोठा घातापाताचा कट उंदिर मारण्याच्या विषाने भरलेली १४ हजार ९०० कॅप्सूल केली जप्त

मुंबई पोलिसांनी एका संशयिताकडून विष भरलेल्या १४,९०० कॅप्सूल जप्त करून मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा कथित कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान विष भरलेल्या कॅप्सूल वाटून मोठी दुर्घटना घडवण्याची योजना आखली होती. या कॅप्सूलचे वितरण होण्यापूर्वीच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून १४,९०० विषारी कॅप्सूल …

Read More »

मुंबईतील विधानभवनासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी विधानभवन केले रिकामे, प्रशासनात खळबळ

आंतरराष्ट्रीयस्तरावर अमेरिका आणि इस्रायलने इराण देशाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर होत आहे. त्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच संसदेचे आणि महाराष्ट्रात विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. मात्र या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सगळी कडेकोट सुरक्षा असताना मुंबईतील विधानभवनासाह सार्वजनिक …

Read More »

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण १०० आणि ११२ या हेल्पलाइन नंबरवरील तक्रारीवर पोहोचता यावे यासाठी घेतल्या गाड्या

मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात …

Read More »