Tag Archives: मुंबई महापालिका निवडणूक

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुशासन, विकास आणि पारदर्शकतेचा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपा-महायुतीच्या विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात साज-या झालेल्या विजयोत्सवावेळी मुख्यमंत्री …

Read More »

दगडू सकपाळ यांचा शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेचा उबाठाला झटका

उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सकपाळ यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेने उबाठाला जोरदार झटका दिला.  शिवसेना वाढवण्यासाठी तुरुंगवास भोगणारे, शेकडो केसेसे अंगावर घेणाऱ्यांना निष्ठावान शिवसैनिकांना बाळासाहेब सवंगडी समजायचे मात्र आज काहीजण बाळासाहेबांच्या सवंगड्यांना घरगडी समजत …

Read More »

काँग्रेसची तक्रार, निवडणूक आयोगाची दखल, मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस मुख्यमंत्री फडणवीसांच्या आचारसंहिता भंगाबाबत काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारी २०२६ रोजी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये एका खाजगी चॅनेल व त्यांच्या टीमला दिलेल्या मुलाखतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी ही माहिती दिली. या संदर्भात, ९ जानेवारी २०२६ …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा विश्वास, काँग्रेस पक्ष नेहमीच उत्तर भारतीयांच्या पाठीशी सक्षमपणे उभा मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलने सात कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे आणि स्वयंरोजगाराचे रक्षण करण्यासह अनेक प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूल, दत्त मंदिर रोड, मालाड (पूर्व) येथे आयोजित जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करा मुंबईच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याची केली मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील …

Read More »

संजना- सजंय घाडी यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का

उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी मेहनत घेऊन यशस्वी प्रयत्न …

Read More »