Tag Archives: bjp

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, डॉ. दाभोलकर व फडणवीसांची तुलना करणारे खा. सुप्रिया सुळेंचे विधान दिशाभूल करणारे डॉ. दाभोलकर व फडवणीसांची तुलना होऊच शकत नाही, दोघांच्या विचारांचा वारसा व मार्ग भिन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांचे विधान दिशाभूल करणारे, चिड व संताप आणणारे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व देवेंद्र फडवणीसांची तुलना होऊच शकत नाही, दोघांच्या विचाराचा वारसा व मार्ग भिन्न आहेत, असे स्पष्ट करून खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे …

Read More »

महिलांचा ऑनलाइन लैंगिक छळ महागात पडणार दोषींना तीन वर्षांचा तुरुंगवास

राज्यात महिलांवरील वाढत्या ऑनलाइन लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना केल्या आहेत. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एका दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे, जे डिजिटल माध्यमांद्वारे होणाऱ्या लैंगिक छळाला स्पष्टपणे गुन्हेगारी ठरवते. भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता (IPC) दुरुस्ती विधेयकानुसार, सोशल मीडिया, ईमेल, मोबाईल फोन किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमाद्वारे महिलेकडे आक्षेपार्ह …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख अर्थसहाय्य मंगळवारी वितरित करण्यात आले. त्यावेळी मुंबईत केवळ मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भोंदूबाबाची माहिती दिवाळीमध्येच मुख्यमंत्र्यांकडे होती; तर सहा महिने झोपा काढल्या काय? मंत्री पोलिसांकडून मार खातात हे अत्यंत गंभीर; साताऱ्यातील प्रकरणाने वोटचोरीवर पुन्हा शिक्कामोर्तब

दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल उपस्थित करून खरात प्रकरणाने जी विकृत चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया नियंत्रणाबाबत धोरण ठरणार लहान मुलांच्या संदर्भात तयार करणार ठोस धोरण

राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. …

Read More »

सातारा प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा तो निर्णय सभापती शिंदे यांनी रोखून धरला पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाची कारवाईबाबता निर्णय

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी युतीचे संख्याबळ असूनही आपला अध्यक्ष बनवून चांगलाच दणका दिला असताना आता अधिवेशनातही भाजपाने शिंदे गटाला अक्षरश: धोबीपछाड दिला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांत राडा, वादावादी आणि चक्क शिंदे गटाच्या मंत्र्यांना धक्काबुक्की झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज विधान …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव रा. स्व. संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा नरेंद्र मोदी का घाबरतात? सरसंघचालकांनी १५ दिवसात नरेंद्र मोदींना जाब विचारावा: अॅड. प्रकाश आंबेडकर

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींना अटकही करण्यात आलेली आहे. पण भारतात मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पंतप्रधान झालो, असे मोदी सांगत …

Read More »

अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला डिवचलं, आता कुठे गेले तुमचे वाघ? मंत्री मार खातायत, साताऱ्यातील घटनेवरून खिल्ली उडविली

सातारा जिल्हा परिषद निवडणूकीतील रणनीतीवरून नैसर्गिक युतीतील भाजपा आणि शिवसेना ओएफसी वाद रंगल्याचे चित्र दिसायला लागले आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत व्हीप बजावण्यासाठी गेलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळातील सहकारी पक्षातील मंत्रीच या सत्तेसाठी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र पाह्यला मिळाले. दरम्यान याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

सातारा जि.प. निवडणूकीचे पडसाद विधिमंडळात, एकनाथ शिंदे यांनी सांगितले मार खान्याची गोष्ट नैसर्गिक युतीतल्या भाजपाच्या मारहाणीचे कथन शिवसेनाओएफसीकडून विधिमंडळात

राज्यात मूळ शिवसेना असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंड करत भाजपाबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी म्हणून तत्कालीन शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक मोठा गट भाजपाबरोबर गेला. सत्तेत गेला, सत्तेत रमला आणि आणि आता त्याच्या मिळणाऱ्या उबीतून बाहेर पडायलाही तयार होईना. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मतदानाला जात …

Read More »

जयराम रमेश यांची पंतप्रधान मोदींवर टीका, इराणवरील हल्ल्याचा निषेध करण्यातही अपयशी भारतीय सभ्यतेचा अपमान करण्यात मात्र पुढाकार

काँग्रेसने शनिवारी (२१ मार्च, २०२६) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध करण्यात सरकार अपयशी ठरल्याने हा निषेध करण्यात आला आहे, ज्यामुळे आर्थिक व्यत्यय निर्माण झाला आहे. काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांची ‘X’ वरील ही मोठी सोशल मीडिया पोस्ट, …

Read More »