चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा) ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार
महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत …
Read More »आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लॉजिस्टीक पार्क भिवंडीसाठी जाहिर करा अर्थसंकल्पामध्ये भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्कची घोषणा करावी
राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या गीग कामगारांना सुविधा मिळण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक आणावे तसेच भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्क जाहीर करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात सोमवारी पत्र लिहिले आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, …
Read More »उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली मोदी, शाहची भेट पदभार स्विकारल्यानंतर मोदी-शाह यांची भेट घेतली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी आणि शहा यांच्यासोबतची ही त्यांची पहिली भेट आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्रिपदाची …
Read More »राहुल गांधी यांच्या आरोपानंतर हरदीप सिंग पुरी यांचा खुलासा, होय मी एपस्टाईनला भेटलो पण आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी राहुल गांधी यांनी कुप्रसिद्ध एपस्टाईन फाइल्सशी त्यांचा संबंध जोडल्याच्या आरोपांना खोडून काढले आणि आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या (आयपीआय) शिष्टमंडळाचा भाग म्हणून लैंगिक गुन्हेगाराला भेटल्याचा खुलासा केला. राहुल गांधींच्या स्फोटक लोकसभेतील भाषणानंतर पत्रकार परिषद घेत मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण दिले. हरदीप सिंग पुरी …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, लाज वाटली पाहिजे, भारत विकला अर्थसंकल्पावरील भाषणा दरम्यान संसदेत पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका-भारत व्यापार करारावरून साधला निशाणा
लोकसभेत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर अमेरिकेसोबतच्या नुकत्याच झालेल्या व्यापार करारावरून हल्ला चढवला आणि सरकारला याची लाज वाटली पाहिजे असे म्हटले. त्यावर तीव्र हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले की, केंद्राने “भारत विकला”, तसेच अमेरिकन वस्तूंना प्रवेश देऊन सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान …
Read More »चंद्रपूरात भाजपाच्या महापौराला शिवसेना उबाठाचा पाठिंबा भाजपाशी अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठाने केली युती
राज्यात आणि देशात भाजपाच्या घंटा बडवणारे हिंदूत्ववादावरून आणि राजकिय हेवेदाव्यातून शिवसेना उबाठा आणि भाजपाची २५ वर्षाची युती तुटली. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना उबाठा या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला. मात्र चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पक्षातच सत्तेपूर्वीच दोन गटात संघर्ष सुरु झाला. त्यामुळे भाजपाने या संधीचा फायदा घेत थेट शिवसेना उबाठाशी आणि …
Read More »रविंद्र चव्हाण म्हणाले, महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर केले प्रतिपादन
१२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. १२ जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, असे प्रतिपादन भारतीय …
Read More »साताऱ्यात मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड, मतदारांचा घराणेशाहीला स्पष्ट नकार मंत्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांच्या गडाला धक्का
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रस्थापित नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी धाडून मतदारांनी विकासाला आणि नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मंत्री मकरंद पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला असून, महाबळेश्वरच्या तळदेव गटात शिवसेनेच्या (शिंदे गट) अजित …
Read More »मंत्री जयकुमार गोरे यांच्या बंधूचा निवडणूकीत पराभव, पण वहिनीचा विजय ठरला चर्चेचा? मनिषा फडतरे यांच्या विजयावर आक्षेप घेत पुर्न मतमोजणी घेण्यात आली त्यानंतर भारती गोरे विजयी
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी एका बाजूला महायुतीला दिलासा मिळाल्याचे चित्र असले तरी दुसऱ्याबाजूला मात्र अनेक भाजपाच्या मंत्र्यांच्या गडाला चांगलेच हादरे बसल्याचे दिसून आले. त्यापैकीच एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मंत्री जयकुमार गोरे यांना हादरा बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे …
Read More »
Marathi e-Batmya