भाजपाने आपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी आवश्यक कोरम पूर्ण केला आहे. पक्षाची वैचारिक पालक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सोबत चर्चा झाली आहे. संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपा नेतृत्वाला भर दिला आहे की त्यांच्या अध्यक्षाची नियुक्ती ही नियमित संघटनात्मक प्रक्रिया नाही तर पक्षाचे पुनर्संचयित करण्याची संधी आहे. बॅकचॅनल चर्चेत, संघाच्या कार्यकर्त्यांनी …
Read More »मुंबईत १०६ ठिकाणी शिव आरती व शिव जल्लोष छत्रपती शिवाजी पार्कवर साजरा झाला जल्लोष
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्या बद्दलचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या मुंबई भाजपातर्फे मुंबईत १०६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व शिव जल्लोष साजरा करण्यात आला. तर आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले …
Read More »महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश
राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, अदानीसाठी रथयात्रा थांबविण्यात आली समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द कायद्यातून काढून टाकण्याची योजना
ओडिशातील भाजपा सरकार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की गेल्या महिन्यात भारतीय अब्जाधीश आणि त्यांच्या कुटुंबासाठी जगन्नाथ यात्रा रथ थांबवण्यात आले होते. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “जेव्हा ओडिशात जगन्नाथ यात्रा काढली जाते, तेव्हा रथ (रथ) ओढले …
Read More »उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावर म्हणाले, विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा विधान परिषदेत विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात सभात्याग, बहुमताने विधेयक मंजूर
विधानसभेनंतर महाराष्ट्राचे बहुचर्चित जन सुरक्षा विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत बहुमताने मंजूर करण्यात आले. प्रचंड गदारोळात गृह राज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी सभागृहात विधेयक मांडले. विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केले. त्यावर चर्चा झाल्यानंतर, विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत मंजूर झाल्यानंतर योगेश कदम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत हे विधेयक सादर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, भोंग्यांच्या दंडातील अर्धी रक्कम तक्रारदाराला संजय राऊत यांचे नाव न घेता विचारांच्या प्रदुषणाचे काही करता येत नाही
मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटविण्यात आले असून मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर सध्या भोंगा नाही. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण १,६०८ अनधिकृत भोंगे हटवले असून, ही संपूर्ण कारवाई कोणताही तणाव निर्माण न होता शांततेत पार पडली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अखेर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे कारवाई
आरक्षणाचा लाभ ज्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे, त्याच धर्मात असण्याबाबत निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करून धर्मांतर करीत आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार हे विधेयक म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर घाला
बहुचर्चित महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक काल विधानसभेत आणि आज विधान परिषदेत मंजूर बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला थेट फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचे सांगत या विधेयकाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश …
Read More »चंद्रकांत पाटील यांची माहिती, एमएचटीसीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरविण्यात आले
महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटीसीईटी) सुरळीत पार पडावी, यासाठी राज्यातील पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरविण्यात आले आहे. त्यामुळे आता एमएचटीसीईटीच्या परीक्षा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये घेतल्या जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात झालेल्या एमएचटीसीईटीच्या परीक्षेत …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
१०० वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, …
Read More »
Marathi e-Batmya