राहुल गांधी यांनी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरून व्यक्त केली खंत सुसंस्कृत समाजाला हादरवून टाकणारी शोकांतिका

बलात्कार आणि छळाला सामोरे गेल्यानंतर महाराष्ट्रातील सातारा येथील डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका असल्याची भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

डॉ संपदा मुंडे यांच्यावर यंत्रणेने अत्याचार आणि छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्ट वरून व्यक्त केली भावना.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या एका आशादायक डॉक्टरला भ्रष्ट सत्ता आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाला बळी पडावे लागले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती त्यांनी या निष्पाप महिलेविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला: बलात्कार आणि शोषण. वृत्तांनुसार, भाजपाशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनीही तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, सत्तेने संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही – ही संस्थात्मक हत्या असल्याचा गंभीर आरोप करत जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो? डॉ. संपदा यांच्या मृत्यूने या भाजपा सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस आणला असल्याची टीका केली.

शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारतातील प्रत्येक मुलीसाठी – आता भीती नको, आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट; किमान ८ जणांचा मृत्यू दिल्ली, मुंबई आणि कोलकाता परिसरात हाय अलर्ट

सोमवारी (१० नोव्हेंबर २०२५) संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या उच्च-तीव्रतेच्या स्फोटात किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *