केद्र सरकार आणू पहात असलेल्या डिलीमिटेशन विधेयकावरून काँग्रेस, शिवसेना उबाठा, समाजवादी पार्टीने विरोधाची भूमिका स्विकारली आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपा समर्थित राजकिय पक्ष आणि काही राजकीय ठोकताळे बांधत काही नव्याने राजकीय पक्ष भाजपा आणू पहात असलेल्या डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहिर करत आहेत. त्यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षही आघाडी आहे. त्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांना उद्देशून ते होकायंत्र नाही तर धोकायंत्र असल्याचा टीका करत उपरोधिक टोला लगावला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे आज कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींही केंद्र सरकारकडून संसदेत उद्या आणू पहात असलेल्या डिलीमिटेशन विधेयकावरून राज ठाकरे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या संसदेत ५४८ खासदार आहेत. इतकी मोठी संख्या असूनही एकाही राज्यातील किंवा राज्यातील जिल्ह्यांचे प्रश्न तसेच आहेत. त्यात आता डिलीमिटेशन विधेयक संसदेत मांडून ही संख्या ८८० इतकी वाढणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवून भाजपाला काय साध्य करायचं आहे असा सवालही यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, भविष्यात उत्तर भारत विरूद्ध दक्षिण भारत असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र हा दक्षिणेतच येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र तामिळनाडू, महाराष्ट्रातील खासदारांची संख्या वाढल्यानंतर हा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र हा दक्षिणेकडील राज्यासोबत असल्याने हा अन्याय होणार आहे. डिलीमिटेशनचे विधेयक राज्यांना केंद्राच्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा हा आणि त्यांची स्वायतत्ता कमी कऱण्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगितले.
राज ठाकरे पुढे म्हणाले, महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलीमिटेशन करण्याची काय गरज आहे असा सवाल केंद्र सरकारला विचारा. तसेच महिला आरक्षण लागू करण्यासाठी डिलीमिटेशनचा आधार कशासाठी घेतला जात आहे असा सवाल उपस्थित करत खासदारांची संख्या वाढवून केंद्र सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे. दिवसेंदिवस देशातील प्रत्येक राज्यांचे प्रश्न जटील बनत आहेत. खासदारांची संख्या वाढवल्यानंतर राज्यांना आर्थिक स्वायतत्ता मिळणार आहे का असा सवाल करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, संपूर्ण देश केंद्राच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी केला.
Marathi e-Batmya