Tag Archives: congress

वर्षा गायकवाड यांचा सवाल, अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ? मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये ‘पाण्यात’; मुंबईची ‘वाताहत’ होण्यास भाजपाच जबाबदार

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, महापौर व पालिका आयुक्तांवरच ३०२ चा गुन्हा नोंदवा मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी, जबाबदारी निश्चित करून कारवाई करा

मुंबईत मागील दोन दिवस पडलेल्या पावसाने भाजपा सरकार, बीएमसी प्रशासन व महापौरांनी नालेसफाईचे केलेले दावे फोल आहेत, हेच दाखवून दिले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही तर ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. पहिल्या पावसात झाड कोसळून …

Read More »

मिनाक्षी नटराजन यांचा आरोप, वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकता चोरीचे देशासमोर मोठे संकट मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणे हा लोकशाहीवरच मोठा अन्याय, आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज: हर्षवर्धन सपकाळ

देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, ओबीसी विचार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवा महात्मा फुले व्दिशताब्दी जयंती निमित्त ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार कार्यक्रम टिळक भवनमध्ये संपन्न.

ओबीसी विचार महाराष्ट्राने देशाला दिला आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचार व वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे दोन स्रोत आहेत आणि या विचाराचा माणूस जातीच्या पलीकडे पहात असतो. महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, बिश्नोई गँगचा महाराष्ट्रात वाढता धुमाकूळ,खंडणीसाठी धमक्या आणि गोळीबाराच्या घटना बिश्नोई आणि लोणकर वर कारवाई कधी करणार?

महाराष्ट्रात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेली खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पिंपरी-चिंचवड …

Read More »

आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग..! व्यापक चर्चेअंती निर्णय घेऊ - मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सखोल चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालून सभात्याग केला. हा विषय फार महत्त्वाचा आणि गंभीर असून दलित समाजावर अन्यायकारक आहे अशी टीका विरोधकांनी केली. या विषयावर व्यापक चर्चेअंती, सर्व सहमतीने निर्णय घेऊ,कोणावरही अन्याय केला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. …

Read More »

टीईटीच्या पेपरफुटीवरून विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ चर्चेसाठी विधान परिषदेत विधानसभेत विरोधक आग्रही

एकामागून एक पेपरफुटीच्या  घटना राज्यात होत असताना २८ जूनला होणाऱ्या टीईटीच्या परीक्षेला पेपर २७ जूनलाच फुटल्याने त्या परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षक होऊ पाहणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न भंगले असल्या कारणाने विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला ठेऊन स्थगन प्रस्ताव मांडत सर्व कामकाज बाजूला सारत याप्रश्नी चर्चा करावी अशी मागणी विधानसभेत शिवसेना …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, पक्ष फोडण्यासारखे पेपर फुटीचेही पेव फुटले, सरकार नावाची व्यवस्था आहे की नाही? टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करा

रविवारी होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर ठाण्यात लीक झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत असून भाजपा महायुती सरकारला एक परिक्षाही घेता येत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेपर फुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. या पेपरफुटीच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याऱ्यांना अशी …

Read More »

काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीरः यादी पहा संघटन सृजन अभियानांतंर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून नियुक्त्या

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात पक्ष संघटना बांधणीवर भर देत संघटन सृजन अभियान हाती घेतले असून या अभियातून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याच अभियानाच्या धर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात ब्लॉक अध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया राबिवली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आऱोप, राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे मोदी व RSS चे ‘खास’ लोक राम मंदिरासाठी दिलेल्या सोने चांदीच्या विटांचा हिशोब द्या, ‘मैं भी खाऊंगा, मेरे लोगों को भी खाने दूंगा’, हे चालणार नाही

मोघलांनी देशातील मंदिरे लुटली, सोमनाथचे मंदिर मोहमद गझनीने लुटले पण सध्या मंदिर लुटणारे स्वकीयच निघाले. भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच लुटले आहे. हा सर्व प्रकार तळपायाची आग मस्तकात जाणारा आहे, पण रामाच्या व हिंदूच्या नावावर राजकारण करणारा भाजपा व रा. स्व. संघाचा एकही नेता या दरोड्यावर …

Read More »