Tag Archives: congress

लॉर्ड माऊंटबँटनचे ओएसडी म्हणतात जम्मू -काश्मीरचा प्रश्न नेहरूंमुळे नव्हेतर ब्रिटीशांमुळे राजकिय गुंतागुत केवळ ब्रिटीशांनी निर्माण केली

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना भाजपाध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला लागू असलेले ३७० कलम आणि ३५ ए हे कलम काढून टाकल्यामुळे हे राज्य पूर्णतः आता भारताचे झाले आहे. त्याचबरोबर नेहरूंच्या एका चुकीमुळे जम्मू आणि काश्मीरचा अर्धाभाग पाकिस्तानकडेच राहीला. …

Read More »

मुख्यमंत्र्यांमुळेच पोलिसांची पगार खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष माजी खा. नाना पटोले यांनी केली. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस …

Read More »

पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलका प्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तात्काळ काढावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक …

Read More »

काँग्रेस आणि राष्ट्रवादी २५० जागा लढविणार तर ३८ जागा मित्रपक्षांना आघाडीचा संयुक्त जाहिरनामा जाहीर करणार - प्रवक्ते नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालेले असून काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादी १२५ जागा लढविणार असून उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देत आघाडीचा संयुक्त जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार …

Read More »

राज्यातील राजकिय पक्षांच्या दिवाळ-दिवाळीच्या मौसमाला सुरुवात निवडणूक आचारसंहिता लागू

नवी दिल्ली -मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य विधानसभेसाठी निवडणूकांची आचारसंहिता आजपासून लागू होत असून २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी यासाठी मतदार तर २४ ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सत्तेत विराजमान होणारा राजकिय पक्ष दिवाळी साजरी …

Read More »

मेक इन इंडियाच्या गप्पा मारणा-यांच्या काळात फक्त कुलूपांचे उत्पादन वाढले काँग्रेस प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांचा मोदी सरकारवर आरोप

मुंबईः प्रतिनिधी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात भयंकर मंदी आली आहे. कृषी, ऑटो उत्पादन क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांना मंदीचा मोठा फटका बसला असून लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशभरात हजारो लाखो कंपन्यांना टाळे लागले. मेक इन इंडियाच्या गप्पा मारणा-या भाजप सरकारच्या काळात फक्त कुलूप बनवणा-या कंपन्याचे उत्पादन वाढल्याचे दिसत असल्याची टीका …

Read More »

छ.शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून ५० टक्के शेतकरी वंचित एकवेळ समझोता योजना म्हणजे धुळफेक असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप शिवसेना सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून या कर्जमाफीतून ५० टक्के शेतकरी वंचित राहिल्याने शेतक-यांना न्याय देण्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. छत्रपती …

Read More »

राज्यातील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदार वगळा काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची तसेच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा, अशोक …

Read More »

पालघर, मेळघाटमधील बाईक ऍम्ब्युलन्स सेवा बंद पडल्याचा सरकारलाच पत्ता नाही भाजप-शिवसेना सरकारची जाहीरातबाजीमध्येही 'बनवाबनवी'! -विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करुन जनतेची दिशाभूल केली असून आता जाहिरातबाजीतही त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहीरातीत दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारची पाच वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली असून कोणताही घटक …

Read More »

नियोजनशून्य कारभारामुळे पाच वर्षात ६० टक्केच निधी खर्च भाजप-शिवसेना सरकारचा आर्थिक नियोजनात बेशिस्तीचा कळस: विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी भाजप शिवसेना युती सरकारची पाच वर्षातील कामगिरी सुमार झाली असून आर्थिक नियोजनही फसले आहे. सरकारचा आर्थिक ताळेबंद पाहिला तर पाच वर्षात सर्व विभागांसाठी एकूण १४ लाख १३ हजार २७६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती, परंतु ८ लाख ९६ हजार ४८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचाच …

Read More »