Tag Archives: ekanath shinde

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा …

Read More »

अबब…कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत २४३ रुग्ण आतापर्यत ७१ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिझी मुंबई महानगरपालिका हद्दीत ज्या पध्दतीने रूग्ण संख्या वाढत आहेत. त्याच पध्दतीने आज कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २४३ रूग्णांचे आज निदान झाले आहे. विशेष म्हणजे मागील दिवसापासून महापालिकेकडून सातत्याने घरोघरी जावून नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम करत असताना २४ तासात इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांचे निदान झाले. आतापर्यंत १८४८ रुग्णांवर उपचार …

Read More »

बीकेसी- ठाण्यात कमी दिवसात उभारले हजार खाटाचे कोविड रूग्णालय आरोग्य सुविधा उभारणीची महाराष्ट्राने देशासमोर मांडली यशोगाथा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या उपायोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या …

Read More »

स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता उद्योगांचे झोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात नविन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आहे. राज्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्याभागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा …

Read More »

ठाणे शहरात कोरोनाग्रस्तांसाठी रूग्णालय- बेड हवय, मग एक क्लीक करा महापालिकेचे खास संकेतस्थळ कार्यान्वित

ठाणे: प्रतिनिधी ठाणे शहरामध्ये कोव्हीड 19 रूग्णांना महानगरपालिका जास्तीत सुविधा देत असतानाच आता दुसऱ्या बाजूला कोव्हीड बाधितांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरामधील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांची अद्ययावत माहिती रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी www.covidbedthane.in हे विशेष संकेतस्थळ विकसित केले आले आहे. शहरातील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांचे प्रभावी नियोजन आणि …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंसाठी काँग्रेसची माघार: मात्र राष्ट्रवादीसमोर लीन ९ वा उमेदवार मागे

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडूण येण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीला राज्यसभा निवडणूकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधान परिषदेची जास्तीची एक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु राष्ट्रवादीने त्यांच्या हिश्यातील दुसरी …

Read More »

आणखी दोन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुंबईवरून येणाऱ्यांवर बंदी अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी काढले आदेश

मुंबई: प्रतिनिधी ज्या मुंबई शहरात मिळणाऱ्या रोजगाराच्या जीवावर मुंबईच्या आजूबाजूला शहरे वसली आता त्याच लहान-मोठ्या शहरांकडून उपनगरातून मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्याचे सत्र सुरु केले. काल कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांनी अशा आशयाचे पत्रक काढल्यानंतर आता अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी असे पत्रक काढत ८ मे पासून परतणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. …

Read More »

मुंबईत गेलात तर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात परतायचे नाही महानगरपालिकांकडून ८ मे पासून येण्या-जाण्यावर बंदी

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यातच आता कल्याण-डोंबिवली आणि उल्हास नगरातही बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत कामानिमित्त जावून येणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी घेतला आहे. ही बंदी ८ मे पासून अंमलात आणण्यात येणार …

Read More »

मुंबई महानगराची वाटचाल १० हजाराकडे: नव्याने ७९० सापडले मुंबई-ठाणे मिळून ९ हजार ७०९ वर संख्या पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १० हजारने ओलांडली असताना मुंबई आणि ठाणे मंडळ मिळून लवकरच ही संख्या ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात नव्याने ७९० रूग्ण आढळून आले असून राज्याची संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. तर मुंबई शहरातील बाधितांची संख्या ८ हजार ३५९ वर …

Read More »

लॉकडाउनमध्ये भटकणाऱ्या दुचाकीस्वाराची कर्मचारी महिलेला धडक महिला रूग्णालयात दाखल तर स्वार पळून जाण्यात यशस्वी

ठाणे: प्रतिनिधी ठाणे महापालिकेच्या एका कंत्राटी सफाई कर्मचारी महिलेला एका बाईक स्वाराने जोरदार धड़क दिली. ज्यामधे ही महिला गंभीर जख्मी झाली आहे, ठाण्याच्या पोखरण नंबर २ रस्त्यावर रोज प्रमाणे कंत्राटी महिला सफाई कर्मचारी संगीता पोफळकर या रस्ते सफाईचे काम करत होत्या, लॉक डाउन असताना एक युवक अतिवेगाने मोटर सायकलवर आला …

Read More »