मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती …
Read More »नीलम गोऱ्हे यांना उपसभापती म्हणून…देवेंद्र फडणवीस म्हणाले, तो नियम लागू होत नाही उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणता येणार नसल्याची स्पष्टोक्ती
शिवसेना ठाकरे गटात असलेल्या विधान परिषदेच्या आमदार तथा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून विरोधकांनी उपसभापती हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे अशा पदावर असलेल्या व्यक्तीने राजकिय पक्षात प्रवेश करू नये या मुद्यावरून काल विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. तसेच आजही याविषयीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. …
Read More »बार्टीच्या प्रश्नावरून भाजपा आणि पवार गटाच्या नेत्यांनी धरले शिंदे गटाच्या मंत्र्याला कोंडीत अखेर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आश्वासन उत्तर सुधारून देण्याचा प्रयत्न
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबत आणि त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न दिल्याने भाजपा आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे विधानसभेत दिसून आले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या शंभूराज देसाई यांना धारेवर धरत …
Read More »अजित पवार गट- शरद पवार यांच्यात चर्चा, जयंत पाटील यांनी दिली ही माहिती भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही अशी शरद पवार यांची भूमिका
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार यांनी राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर यथेच्छ टीका केली. त्यानंतर आता कायदेशीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून अजित पवार गटाने नमती भूमिका घेत काल रविवारी आणि आज …
Read More »विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती पदावर विरोधकांनी घेतला आक्षेप अखेर विरोधकांचा सभात्याग
विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच संपलं. नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे असं ते म्हणाले. जे सभागृह आपण चालवत असताना ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष नसतो असं जयंत पाटील …
Read More »शरद पवार यांच्या मनधरणीसाठी अजित पवार गट पुन्हा चव्हाण प्रतिष्ठानमध्ये प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवार हे आमचे दैवत, पक्ष एकसंध व मार्गदर्शन घेण्यासाठी आलो
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर आज विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात अजित पवार समर्थक आमदार सत्ताधारी बाकावर आणि शरद पवार समर्थक आमदार विरोधी बाकावर बसल्याचे दिसून येत होते. मात्र …
Read More »अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये संभ्रम “इकडे की तिकडे?” दोन नेत्यांची बाजू घेण्याऐवजी गैरहजर राहणेच बरे असे समजून गैरहजर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वा विरोधात त्यांचेच पुतणे तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन भाजपा-प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देत सहभागी झाली. आतापर्यंत शरद पवार यांनी आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करत अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भूमिका …
Read More »फडणवीसांनी उल्लेख केलेल्या शिंदे सरकारला लिहिलेल्या विरोधकांच्या पत्रात आहे तरी काय? वाचा तर मग या कारणामुळे चहापनावर टाकला बहिष्कार
राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या रूपाने तिसरे इंजिन लागलेले असतानाही वेगवान निर्णय गतिमान सरकार या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजाणी होताना दिसत नाही. तसेच मागील एक वर्षाच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारने वारेमाप घोषणा केल्या. मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचबरोबर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आदींसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अंबादास …
Read More »अजित पवार गट आणि शरद पवार भेटीत काय झाली चर्चा? जयंत पाटील यांनी दिली ही माहिती आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचा जयंत पाटील यांचे प्रतिपादन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करत राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी बंडखोर गटाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकर, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी …
Read More »अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, …मला वाटत नाही काही राजकिय समिकरणं तयार होतील का याची कल्पना नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरु होणार असतानाच आज रविवारी एक दिवस आधीच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ९ मंत्र्यांच्या गटाने शरद पवार यांची वाय.बी.चव्हाण …
Read More »
Marathi e-Batmya