Tag Archives: midc

एकनाथ शिंदे यांची घोषणा, ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार ‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड, एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील लाभार्थ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी १७ ठिकाणी एसआरए समुह पुनर्विकास प्रकल्पाच्या घोषणेसोबतच ‘एसआरए अभय योजने’ला डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ, तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटींची संख्या वाढविण्याच्या घोषणांचा समावेश आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या ओसीसाठीच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत ‘मेगा प्रोजेक्ट’ देऊ १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. फलटण शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये एक मोठा (मेगा) औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध …

Read More »

उदय सामंत यांचे आश्वासन, जर्मनीतल्या उद्योजकांसाठी एमआयडीसी मध्ये ५०० एकरचा भूखंड जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ

आज जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. ही सुरुवात मराठी संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली. जर्मनीतही मराठी …

Read More »

उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात विविध उद्योग समूह गुंतवणूक करीत आहेत. या उद्योगांना आवश्यक असणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मागणी विचारात घेऊन जलसंपदा विभागाने विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उद्योगांकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, एमआयडीसीतील कंपन्यांचे स्थलांतर करणार उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय, महिनाभरात योजना तयार करणार

काही दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदोन कंपन्याच्या बॉयलर स्फोटात १४ कंपन्यांचे नुकसान झाले. तर दोन किलोमीटरच्या परिसरातील घरांच्या काचा फुटून काही नागरिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीतील उद्योगांचे ए, बी, सी अशा स्वरूपात वर्गीकरून त्या कंपन्यांचे नुकसान न होऊ देता इतर ठिकाणी अर्थात पुढील २५ वर्षात लोकवस्ती होणार नाही अशा जागेत …

Read More »

संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल

देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. मोशी येथील …

Read More »

रिलायन्स कंपनीला दिलेल्या पाच विमानतळांचा ताबा राज्य सरकार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एमआयडीसीला आदेश

राज्यात २००९ साली शासकिय जमिनीवरील विमानतळांचा विकास आणि तेथील प्रवाशी व्यवस्था सुरु करण्यासाठी एमआयडीसीच्या मालकीची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला पाच विमानतळे चालविण्यासाठी देण्यात आली होती. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचा समावेश होता. ही पाचही विमानतळे रिलायन्स कंपनीला भाडेपट्ट्याने दिल्यानंतरही मात्र, गेल्या १४ वर्षांत …

Read More »

अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित ‘एमआयडीसी’ सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम ९७ …

Read More »

एमआयडीसीवरून रोहित पवार यांचे आंदोलन, तर अजित पवारांची स्पष्टोक्ती, अधिवेशन संपायचाय.. रोहित पवार यांच्याऐवजी अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न

अहमदनगर मधील कर्जत-जामखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ मात्र येथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यास राज्य सरकारने मंजूरीही दिली होती. परंतु एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यास अद्याप मंजूरी देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ रोहित पवार यांनी विधिमंडळ …

Read More »

धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही

राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला …

Read More »