Tag Archives: monsoon session

राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील ४५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या घटनेसंदर्भात सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी मकोका कायदा विशेष पथकाद्वारे धडक मोहीम सुरू

राज्यात सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. राज्यात विनापरवाना सुरू …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अवैध डान्स बार रोखण्यासाठी पोलीस कायद्यात दुरुस्ती करणार विधानसभेत दिली माहिती

राज्यात डान्स बारवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या विद्यमान कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र पोलीस अधिनियमात दुरुस्ती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या दुरुस्तीनंतर डान्स बार चालविण्यासाठी  महाराष्ट्र डान्स बार कायद्यांतर्गतच परवाना घेणे बंधनकारक राहील. पोलीस कायद्यांतर्गत केवळ सादरीकरण (परफॉर्मिंग लायसन्स) घेऊन डान्स बार चालविण्याची प्रथा …

Read More »

दादा भुसे यांची माहिती, मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर दंडासह मान्यता रद्द कारवाई राज्यात मराठी भाषा सक्तीचा कायदा लागू

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. मराठी  न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द  करण्यात येईल, असे  शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी  विधानसभेत सांगितले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, मराठी भाषा …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश,खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाई

राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून त्यानुसारच रुग्णांकडून देयके आकारावीत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नियमबाह्य पद्धतीने रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी संबंधित रुग्णालयांना ब्लॅकलिस्टही केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य बापूसाहेब पठारे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावरील …

Read More »

वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती, वणव्यांबाबत जनजागृती वाढविण्यावर भर शासकिय आणि खाजगी वनांमध्ये वणवा पेटण्याच्य अनेक घटना

कोकणातील वणव्यांच्या घटनांमागे मोठ्याप्रमाणात जनजागृतीचा अभाव आणि शेतकऱ्यांमधील गैरसमज कारणीभूत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले. वणवे रोखण्यासाठी वन विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायती, महसूल यंत्रणा; तसेच लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य प्रशांत ठाकूर यांनी कोकणातील वणव्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना …

Read More »

त्या शोकप्रस्तावातील चुकीच्या वाचनाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून दिलगिरी तांत्रिक त्रुटींमुळे चुका झाल्याचा विधानसभेत खुलासा

विधानसभेत पद्मविभूषण तथा प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या शब्दोच्चारातील चुकांवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. शब्दोच्चारातील चुकांमुळे राहुल नार्वेकर यांच्यावर राज्यभर टीकेची झोड उठल्यानंतर मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान असून, शोकप्रस्तावाच्या वाचनावेळी झालेल्या चुका या केवळ तांत्रिक कारणांमुळे झाला असल्याची …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार नाशिक मधील टीसीएसमधील नीदा खान प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान कायदे व नियमांचे पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा व विधानपरिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, सलग सात दिवसाच्या आंदोलनानंतर आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे कर्मचारी हिताला प्राधान्य देत विविध मागण्या मान्य

परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून, राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, परिवहन विभागातील कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी १६ जून २०२६ पासून बेमुदत …

Read More »

मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा. ‘नो युवर डॉक्टर’ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार आमदार विजय देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली घोषणा

राज्यातील नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ ही क्यूआर कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती तात्काळ मिळू शकते, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. सोलापूर जिल्ह्यातील …

Read More »