लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगाव येथील पक्षाचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या सभांना राहुल प्रथम संबोधित …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा अजेंडा कोण करतंय सेट, भाजपा-महायुती की मविआ? विधानसभा निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा होतोय सेट
साधारणतः २००९ सालापासून राज्यातील विधानसभा निवडणूका असतील किंवा लोकसभेच्या निवडणूका असतील परंतु आतापर्यंत राज्यातील निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा सेट करण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र २०१९ आणि २०३४ निवडणूकीत राज्यातील विरोधक थोडे भानावर येत निवडणूक कोणतेही असो पण भाजपाच्या अजेंड्यावर निवडणूक लढायची नाही असा निर्धार केलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाने …
Read More »अमित शाह यांची टीका, राहुल गांधी यांच्या चार पिढ्या…. सांगलीत नवे विमानतळ बनविणार असल्याची अमित शाह यांची ग्वाही
महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केले. सांगली येथे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी झालेल्या विराट सभेत अमित शाह बोलत होते. कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यावेळी उपस्थित होते. …
Read More »किरण रिजीजू यांची टीका, संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही राहुल गांधी यांच्यावरही घणाघाती टीका
संविधानाची अनेकदा मोडतोड करणाऱ्या आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाऱ्या काँग्रेसला जनता यावेळी माफ करणार नाही, असे सांगत आतापर्यंत केलेल्या संविधानाच्या अवमानाबद्दल आधी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संसदीय कार्य मंत्री किरण रिजीजू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा मिडिया सेंटर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत किरण रीजिजू …
Read More »रमेश चेन्नीथला यांची माहिती, काँग्रेसच्या प्रचाराला खर्गे, राहुल-प्रियंका गांधी यांच्या सभा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या प्रमुख उपस्थितीत १० नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार
वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, देवाभाऊ जिकडे जाऊ तिकडं खाऊ महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत तरूणासाठी केली घोषणा
महाविकास आघाडीच्या झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी, शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी गॅरंटी जाहिर केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कर्नाटक, तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला देण्यात आलेल्या गॅरंटी कायम देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी मविआच्या वतीने महिला आणि शेतकऱ्यांसाठी गॅरंटी देण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठाचे प्रमुख …
Read More »काँग्रेस-महाविकास आघाडीच्यावतीने राहुल गांधी यांच्याकडून या गॅरंटी जाहिर महिलांना मोफत प्रवास आणि बँक खात्यात थेट ३ हजार रूपये देणार
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुमारंभ करत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचारसभा आज बीकेसीतील एमएमआरडीच्या मैदानावर पार पडली. या विधानसभा निवडणूकीला नजरेसमोर ठेवत राज्यातील जनतेसाठी पाच वचनांची गॅरंटी यावेळी जाहिर करण्यात आली. यातील पहिल्या गॅरंटीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, राज्यातील महिलांना महाराष्ट्रात कोठेही प्रवास मोफत करण्यात येणार …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …संविधान वाचवणे भाजपा, फडणवीसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? राहुल गांधींच्या पहिल्याच सभेने भाजपा घाबरली, भाजपाच्या शक्ती स्थळाजवळच कार्यक्रम घेतल्याने जळफळाट
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, …हिंमत नसल्याने आरएसएसचा संविधानावर लपून हल्ला जातनिहाय जनगणनेच्या मागणीमुळे मोदींची झोप उडाली, काहीही झाले तरी जातनिहाय जनगणना होणार व आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा …
Read More »मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत BKC मधील सभेत मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी काँग्रेसच्या ‘गॅरंटी’ जाहीर करणार.
काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर …
Read More »
Marathi e-Batmya