मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून प्रादेशिक पक्षांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय उभारण्यासाठी बिगर भाजपा पक्षांची मोठ बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी उध्दव …
Read More »चंद्रकांत पाटलांचे पुन्हा भाकित, मविआला १० मार्चनंतर सत्ता सोडण्याची वेळ आघाडीच्या मंत्र्यांची तुरुंगाच्या दिशेने वाटचाल
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले. भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत …
Read More »अजित पवार म्हणाले, “चंद्रकांत पाटील म्हणजे उचलली जीभ, लावली…” देशात... राज्यात... शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे
मराठी ई-बातम्या टीम कोणत्याही देशात… राज्यात… शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात.आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे असे सांगतानाच हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित …
Read More »भीमा कोरेगांवप्रकरणी आयोगाचे पुन्हा एकदा शरद पवारांना समन्स महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर स्वतंत्र चौकशीची घोषणा केली होती
मराठी ई-बातम्या टीम भीमा कोरेगांव येथील घटनेनंतर राज्यभरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या हिंसाचारामागे नेमके कोण याचा शोध घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र चौकशी आयोगाची स्थापना करत दंगलीची आणि पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना केली. या आयोगाने लॉकडाऊनपूर्वी काही दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »गानसम्राज्ञीला “अखेरचा हा दंडवत” पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी
मराठी ई-बातम्या टीम सुरेल आवाज आणि आपल्या कल्पक शैलीमुळे तमाम संगीतरसिकांना गाणे, संगीतातून मंत्रमुग्ध करणाऱ्या गान सम्राज्ञी आणि भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मुंबईकरांसह देशातील जनतेने संध्याकाळी ७.१० च्या सुमारास शिवाजी पार्क येथे शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या चितेला मंगेशकर यांचे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी …
Read More »शेतकरी आंदोलनातील ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल 'एक तास राष्ट्रवादीसाठी' उपक्रमांतर्गत जयंत पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
मराठी ई-बातम्या टीम दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष ओढवून न घेण्यासाठी, काहीही कारणे न देता शेतकरी कायदे मागे घेण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा एकंदरीत परिणाम दिसून येईल असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ‘एक …
Read More »पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन – दारू मधला फरक समजून सांगा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
मराठी ई-बातम्या टीम आपण पीत नसल्याने आपल्याला वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच तो समजून द्यावा. किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल, असा उपरोधिक टोला …
Read More »वाईन विक्री निर्णयासंदर्भात शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर फारसं वावगं होणार नाही
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी १०० मीटर क्षेत्रफळाच्या सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाईन विक्री …
Read More »फडणवीसांच्या आरोपामुळे जनाब राऊत बावचळले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील सुपर मार्केट आणि १००० चौरस फुट क्षेत्रफळाच्या दुकानातून वाईन विक्रीस परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून टीकेचा सिलसिला अद्यापही सुरु असतानाच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र फडणवीसांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने थेट शिवसेना प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांच्यावर बावचळल्याची खोचक टीका करत त्यामुळेच त्यांच झिंग …
Read More »पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,… विश्वास कोण ठेवणार? राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत मोदींशी चर्चा झाल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनीच काल एका कार्यक्रमात दिल्यानंतर त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर खोचक टीका करत यांचा इतिहासच खोटे बोलण्याचा आहे. त्यामुळे यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असला …
Read More »
Marathi e-Batmya