Tag Archives: sharad pawar

उदयनराजे भोसलेंचा ८३ हजाराने लोकसभा पोटनिवडणूकीत पराभव माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ४ लाख ८३ हजार मतांनी विजयी

मुंबईः प्रतिनिधी सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूक लढविली. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या सातारकरांनी उदयनराजेंना पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. या पोटनिवडणूकीत श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ८२ हजार ९४७ …

Read More »

भाजपा-सेनेच्या सत्ता उन्मादाला जनतेने नाकारले विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी या निवडणुकीत दिसलं की भाजप – सेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही.मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. विधानसभा निवडणूकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

बंडखोरीमुळे भाजपा-शिवसेनेच्या २८ हून अधिक जागांमध्ये घट होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल काही तासानंतर जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या निवडणूकीत भाजपा आणि शिवसेनेने परस्पराविरोधात बंडखोरी करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारांच्या विजयाची हमी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीचा निकाल अनपेक्षित लागणार असल्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील वांद्रे पश्चिम, माण, मीरा-भाईंदर, …

Read More »

प्रचार थंडावला… शेवट दिवशी भाजपा, राष्ट्रवादी,काँग्रेस, मनसेकडून प्रचारात आघाडी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीकरीता ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला प्रचार आज संध्याकाळी ६ वाजता संपला. मागील २० ते २५ दिवस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेने चांगलाच राजकिय धुराळा उडवून दिला. मात्र खऱ्या लढतीचे चित्र भाजपा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असेच प्रचारात दिसून आले. भाजपाकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

‘भाजपाचा राम’ शिल्लक राहिला नाही अशी वर्तमानपत्रांची हेडलाईन असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

कर्जत जामखेडः प्रतिनिधी कर्जत- जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाईन २४ तारीखला वर्तमानपत्रांची असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जतच्या जाहीर सभेत व्यक्त केला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली. त्यावेळी ते बोलत …

Read More »

तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही चितपट कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांची फळी तयार केलीय- शरद पवारांचा टोला

पंढरपूरः प्रतिनिधी ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्याविरोधी कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. आजचे राज्यकर्ते गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्या विरोधात जो बोलतो त्यावर ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार …

Read More »

भारतातील मुलांपेक्षा नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तानातील मुलांना चांगले अन्न मिळते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

नाशिक – निफाडः प्रतिनिधी या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत. त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी प्रतीचे अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं, ही भारतासारख्या देशाला बातमी चांगली आहे का? असा संतप्त सवाल करतानाच जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो त्या देशातील …

Read More »

१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतरही काही करता येणार नसेल तर बांगड्या भरा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

श्रीगोंदाः प्रतिनिधी १३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर कुणाला काही करता येणार नसेल तर त्यांनी एकतर बांगड्या तरी भरल्या पाहिजेत अशा शब्दात शरद पवार यांनी टीका करत पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचारार्थ जाहीर सभेत ते श्रीगोंदा येथे बोलत होते. काय करायचं आता… काही कामच नाही म्हणतात… …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात इथे निवडणूक नाही..मग पंतप्रधान-गृहमंत्री कशाला येतायत ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल

अहमदनगर – राहुरीः प्रतिनिधी मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्रात निवडणूकच नाही… इथे विरोध करायला माणसंच नाहीत… निवडणूकीची मजा येत नाही… चांगली गोष्ट आहे निवडणूकीची मजा येत नाही तुम्हाला… मग देशाचे पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात… विरोधकच नाही मग गृहमंत्री कानाकोपऱ्यात फिरुन २० सभा का घेतात… मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्यात का हिंडतात असा …

Read More »

पंतप्रधान पदावरच्या माणसानेसुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकावीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा खोचक सल्ला

औरंगाबाद – कन्नडः प्रतिनिधी पंतप्रधान हे पद देशाच्या इज्जतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होवू देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत …

Read More »