शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्धार केला आहे. आज सकाळी प्रवक्ते संजय …
Read More »विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, ते हितचिंतक आणि…
शिवसेनेची-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पक्षप्रवेशानंतर अल्पावधीतच ठाकरे गटात स्वत:ची जागा निर्माण करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली. सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदार आणि नेते यांच्यावर टीका करत असतात. तसेच त्यांनी सुरु केलेल्या प्रबोधन यात्रेत सुरु केलेल्या टीकेमुळे शिंदे गटाची चांगलीच राजकिय …
Read More »भाजपा म्हणते, उद्धवजींना आमदार सोडून गेले, तर उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत ?
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणेघेणे नव्हते. ते बोलत नाहीत म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले तर त्यांच्या काळात उद्योजक महाराष्ट्राबाहेर का जाणार नाहीत ? आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात …
Read More »अखेर खोके टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर, आम्ही ५० नाहीतर २०० खोके देतो भंडाऱ्यातील सभेत दिले विरोधकांना प्रत्युतर
शिवसेनेत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात ४० आमदारांना सोबत घेत स्वतंत्र चूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. तसेच भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारही स्थापन केले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर खोके सरकार अशी टीका सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »पदयात्रेतील शिवसेनेच्या सहभागावर भाजपाची टीका अनावश्यक
कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल पण राहुल गांधी यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे …
Read More »गजानन किर्तीकरांनी ठाकरेंची मशाल सोडत हाती धरली शिंदेंची ढाल तलवार
मागील अनेक दिवसांपासून उध्दव ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच या अनुषंगाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही किर्तीकर हे उध्दव ठाकरे गट सोडणार असल्याचे भाकित वर्तविले होते. त्यानुसार आज गजानन किर्तीकर यांनी उध्दव ठाकरे गटाची साथ सोडत …
Read More »राष्ट्रवादीचा पलटवार, बावनकुळे यांनी मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा आणि नंतर बोलावे अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जादूटोणा केल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले …
Read More »भाजपा म्हणते, राष्ट्रवादीने उध्दव ठाकरेंवर जादूटोणा केला… पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न जयंत पाटील यांनी सोडून द्यावे
राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली. पण आम्ही सावध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान दोनशे जागा जिंकू. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात …
Read More »संजय राऊत घरी आल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, न डगमगता लढतो तोच मित्र
शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांची काल जामीनावर मुक्तता झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. त्यानंतर आज मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांचे उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी औक्षणही केले. यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. …
Read More »संजय राऊत म्हणाले, मी लिहीणारा माणूस दोन पुस्तके लिहीली पण…
मागील तीन महिन्यापासून पत्राचाळ प्रकरणी तुरुंगात राहिलेले उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना काल जामिन मिळाला. त्यानंतर रात्री ६.४५ वाजता त्यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री येथे जात भेट घेतली. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार …
Read More »
Marathi e-Batmya