अखेर खोके टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर, आम्ही ५० नाहीतर २०० खोके देतो भंडाऱ्यातील सभेत दिले विरोधकांना प्रत्युतर

शिवसेनेत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात ४० आमदारांना सोबत घेत स्वतंत्र चूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. तसेच भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारही स्थापन केले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर खोके सरकार अशी टीका सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युतर दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे ५० खोके देत नाहीत तर २०० खोके देतात, हे पैसे विकास कामांसाठी देतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, आज सकाळपासून आतापर्यंत २०० कोटीहून अधिक रुपयांची भूमीपूजनं आणि लोकार्पणं केल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज विदर्भ दौऱ्यावर असून भंडारा येथे विविध उपक्रमांचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. भंडारा येथे झालेल्या जाहीरसभेतून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यात आपल्या सरकारने अनेक विकासकामं केली आहेत. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे, असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, राज्यातील विद्यमान सरकार काम करणारं सरकार आहे, हे सरकार केवळ अडीच-तीन महिन्यातच एवढी कामं करू शकते, तर पुढच्या दोन-सव्वा दोन वर्षात किती कामं करेल, यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

भंडारा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विधानाचा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले, जसं नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे ५० खोके देत नाहीत तर २०० खोके देतात, हे पैसे विकास कामांसाठी देतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, आज सकाळपासून आतापर्यंत २०० कोटीहून अधिक रुपयांची भूमीपूजनं आणि लोकार्पणं केली आहेत. १०० कोटी रुपये केवळ पाईपलाईन प्रकल्पासाठी खर्च झाले आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर असा आहे. पण आपले आमदार नरेंद्र भोंडेकर आणि आपल्या खासदारांचा आग्रह आहे की, समृद्धी महामार्ग पुढे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे हा महामार्ग आम्ही भंडाऱ्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहांची संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत सोयीस्कर जागांचे प्रस्ताव पाठवावेत

आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांऐवजी भविष्यात एकाच ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *