कोरोना काळात वैज्ञानिक दृष्ट्या सर्व निकषांवर खऱ्या ठरणाऱ्या औषधांना आव्हान देत आयुर्वेदीक पध्दतीच्या कोरोनील औषधे योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने बाजारात विक्रीस आणले. तसेच ही औषधे कोरोना या आजारावर प्रभावी असल्याचे सांगत त्याच्या मोठमोठ्या जाहिराती जारी प्रसिध्द केल्या. या खोट्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयात दाद घेण्यात आली. तसेच …
Read More »आयकर विभागाने काँग्रेसला पाठविलेल्या नोटीसीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मागील महिनाभरात काँग्रेस पक्षाला आयकर विभागाने पाठविलेल्या दोन नोटीसींमधून २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील आयकर उत्पन्नातील तफावतीवरून एकूण ३ हजार ५६७ कोटी रूपयांचा दंड ठोठावला. त्यासंदर्भातील काँग्रेसला नोटीसही पाठविली. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सध्याच्या निवडणूकीचा काळ असल्याने …
Read More »वकिलांच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ दखल तर काँग्रेसचा पलटवार
देशभरातील विविध न्यायालयात भाजपाच्यावतीने न्यायालयात वकीलपत्र दाखल करत कायदेशीर बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांच्यासह मानन कुमार मिश्री, अदिश अगरवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांना पत्र लिहित न्यायपालिकेच्या कारभाराच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले. …
Read More »केरळ सरकारची राष्ट्रपती मुर्मु यांच्यासह राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात याचिका
केरळ सरकारने २३ मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केरळ विधानसभेने मंजूर केलेल्या चार विधेयकांना कोणतीही कारणे न सांगता संमती रोखल्याबद्दल आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यावर ही विधेयके दीर्घकाळ आणि अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोणतेही कारण न देता चार विधेयकांना संमती रोखून ठेवण्याची …
Read More »ईडीची मागणी अरविंद केजरीवाल यांना १० दिवसांची कोठडी द्याः न्यायालयाने निकाल राखून ठेवला
ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने, अरविंद केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, न्यायालयाला सांगितले की आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल हे “दारू धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार” होते. तरीही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्याशी संबंध जोडणारा कोणताही “थेट पुरावा” या प्रकरणात नाही. ईडीने न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सांगितले की, अरविंद …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर राज्यपाल म्हणाले,… मंत्री पदाची शपथ देणार
तामीळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी राज्य मंत्रिमंडळात के पोंमुडी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतला. तरीही राज्याचे राज्यपाल आर एन रवि यांनी पोंमुडी यांना शपथ देण्यास टाळाटाळ केली. राज्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचे अधिकार मुख्यमंत्री यांना असतात ते अधिकार किंवा त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपाल यांना नसतात असे स्पष्ट …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, ‘घड्याळ’ चिन्ह वापरा पण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे जाहिर करा
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचा दावा करण्यात आला. परंतु आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणूकीत निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी चिन्ह वापरण्यास मान्यता देत अजित पवार गटाच्या निवडणूक घड्याळ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआयला आदेश, २१ मार्चपर्यंत सर्व तपशील सादर करा
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व तपशीलांचा संपूर्ण खुलासा करण्याचे निर्देश दिले, ज्यात खरेदीदार आणि प्राप्तकर्ता राजकीय पक्ष यांच्यातील दुवा उघड करणाऱ्या बाँड क्रमांकांचा समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती २१ मार्चपर्यंत सादर करावी असे निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने …
Read More »एसबीआयची नवी माहिती, २२ हजार २१७ इलेक्टोरल बॉण्ड विकले तर….
१२ मार्च २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेला इलेक्टोरल बॉण्डच्या विक्रीची आणि त्यापैकी किती राजकिय पक्षांनी विहित कालावधीत इन्कॅश केली याची आकडेवारी न्यायालयात सादर केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत एसबीआयला पुन्हा सुरुवातीपासूनची माहिती आकडेवारीसह नव्याने सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसबीआयने एकूण किती इलेक्टोरल बॉण्ड विकले आणि …
Read More »निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्डची नवी माहिती जाहिर
इलेक्टोरल बॉण्डप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला होता. परंतु एसबीआय बँकेने सादर केलेली माहिती अपूरी असल्याचे सांगत आणखी काही माहिती नव्याने सादर करण्यास सांगितले. त्यानुसार एसबीआय बँकेने इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणातील नवी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर ती बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाने ती माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली. …
Read More »
Marathi e-Batmya