अखेर नाना पटोले विरोधक माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे देशमुखांचे पक्ष सदस्यत्व ६ वर्षांसाठी निष्कासित

काँग्रेसचे माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री व शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसीला ९ एप्रिल रोजी उत्तर मिळाले व या उत्तरावर समितीने चर्चा केली. देशमुख यांंनी आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्ल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात. आशिष देशमुख यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून त्यांना सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *