मुंबई महापालिकेचा अजब कारभार, एका निविदेत कंपनी अपात्र तर दुसऱ्यात पात्र एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र कशा

मुंबई महानगरपालिकेतील परिमंडळ ६ आणि ५ अंतर्गत २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंर्तीच्या दुरुस्ती/पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारचा चमत्कार झाला आहे. एका निविदेत अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांस पाठविलेल्या स्मरणपत्रात माहिती दिली आहे की, महापालिकेने मागविलेल्या अलीकडील निविदासाठी ईएस ४८९ ज्यामध्ये ५ कंपन्यांनी भाग घेतला होता आणि व्यावसायिक अहवालात फक्त तीन कंपन्या पात्र आहेत. दोन कंपन्यांना काही कारणास्तव अपात्र ठरवले गेले. तथापि, ज्या दोन कंपन्या वर्क कोड ईएस ४८९ साठी अपात्र ठरल्या आहेत त्या स्वस्तिक आणि हर्षिल नावाची कंपनी वर्क कोड ईएस ४९० साठी पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी एक एल1 आहे. ईएस ४८९ आणि ई ४९० चे व्यावसायिक अहवाल संशयाच्या नजरेने पाहिले जात असून परिमंडळ ६ अंतर्गत ७ टक्के कमी दराने तर परिमंडळ ५ अंतर्गत १८ टक्के कमी दराने काम दिले जाणार आहे. आता ७ टक्के ऐवजी १३ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी स्वस्तिक आणि हर्षिल कंपनीने दर्शवल्याची माहितीही पुढे आली आहे.

यामुळे कामाची गुणवत्ता राखली जाईल का? हा मोठा प्रश्न असून एकाठिकाणी कंपनी अपात्र होते तर दुसरीकडे पात्र होते. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत यातील चौकशीनंतर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमधले असलेले संगनमत उघडकीस येईल अशी माहिती आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांनी दिली.

About Editor

Check Also

‘आयपीपीएआय’च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसीमेकर्स परिषदेत पुरस्काराचे वितरण

इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *