शरद पवार म्हणतात भाजपला पर्याय काँग्रेसच निवडणूका होतील त्यावेळी देशातील चित्र बदलणार असल्याचे भाकित

मुंबई : प्रतिनिधी

काल चार राज्यांचा लागलेला निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कालचे जे निकाल आले आहेत. त्याबद्दल भाजप सोडून इतर पक्षांमध्ये समाधान आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा पर्याय महत्वाचा पक्ष असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.

हा चार राज्याचा प्रश्न नाही तर यापुढे लोकांना ज्याठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आणि ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल असा दृढ विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले.

सुप्रिम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. आरबीआयच्या गव्हर्नरची नेमणूक सत्ताधारी पक्षांनी केली होती. त्यांनीही राजीनामा त्यांनी दिला. सीबीआयमधील वाद समोर आला आहे. काही मर्यादा ठेवायला पाहिजे. पंतप्रधानांनी जी काही आश्वासने दिली होती ती या निवडणूकीत ते विसरले आणि फक्त एक कुटुंब मांडत राहिले. ज्यांनी पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांना पाहिले नाही. मात्र तरीही एका कुटुंबावर हल्ला करत राहिले त्याचा परिणाम असा निघाला आहे. दरम्यान त्यांच्यावर हल्ले का करण्यात आले? याबाबत लोकांमध्ये प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या संविधानावर हल्ला झाला. त्याबद्दलही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी, आदिवासी यांचा फटका बसेल असे वाटले होते. मात्र शहरी भागात ही ५० टक्के त्यांना फटका बसला आहे ही परिवर्तनाची सुरुवात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने नेतृत्व नवीन पिढीकडे सोपवलं ते लोकांनी मान्य केलं आहे. आघाडी नाही मात्र देशपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी आपले मतभेद विसरुन एकत्र येण्याचे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

दरम्यान निवडणूकीपर्यंत भाजप नेतृत्वाला ठोकण्याचे काम शिवसेना करेल आणि निवडणूकीमध्ये एकत्र येतील याबाबत शंका नाही असा टोलाही पवार यांनी शिवसेनेला लगावला.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *