चेंबूरमधील सिद्धार्थ नगरातील घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एकाच घरातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी येथील चाळीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या दुर्घटनेत एकाच घरातील सात जणांचा समावेश असून त्यात दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. मात्र या आग लागलेल्या ठिकाणी अरूंद गल्ल्या आणि घराची रचना एकावर एक अशी डबल होती. अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटना स्थळापर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या.
ही घटना पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास घडली. यावेळी घरातील सर्वजण झोपेतच होते. घराच्या मीटर बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. येथील चाळीत गुप्ता नावाचे कुटुंबिय रहात होते. मृत्यू मुखी पडलेल्यांमध्ये प्रेम गुप्ता (वय ३०) अनिता गुप्ता (वय ३०), मंजू गुप्ता (वय ३०), परिस गुप्त (वय ७) आणि नरेंद्र गुप्ता (वय १०) अशी नावे आहेत. या आगीच्या घटनेत एकाच घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
या घरात आणखीही काही सदस्य रहात होते. ते ही नागरिक आगीत जखमी झाल्याचे सांगितलं जात असून त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केले. मात्र बऱ्याच शर्तीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी घटनास्थळाला भेट दिले. तसेच घराची पाहणीही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखाची आर्थिक मदत जाहिर कऱण्यात आली असून या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देत दिलासा दिला.
मुख्मयंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल, तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही यावेळी सांगितले.
या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून त्यामागील कारणे शोधली जातील आणि पुन्हा अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी उपाययोजनांचा आढावा देखील घेतला जाईल असे यावेळी स्पष्ट केले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील असेही यावेळी… https://t.co/NxaWdZ09Lk pic.twitter.com/4VOtaV8Qe6
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 6, 2024
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
Marathi e-Batmya