राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय तुजारी वाजवणारा माणूस मोठा करणार, ट्रम्पेट चिन्हावर बंदी नाही

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाबरोबरच ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचे वाटपही काही ठिकाणच्या उमेदवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले होते. या निवडणूक चिन्हाच्या नावात असलेल्या साधर्म्यामुळे बारामती, सातारा आणि अन्य एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला कमी मते मिळाली, तसेच पक्षाची अनेक मते प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराला मिळाली. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येता येता पराभूत झाले. यापार्श्वभूमीवर पिपाणी या निवडणूक चिन्हावर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.

यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केल्यानंतर काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेल्या मागणी संदर्भात निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतला अशी विचारणा केली.

त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पिपाणी आणि तुतारीच्या नाम साधर्म्यामुळे तशी मागणी केली होती. तसेच पिपाणी हे निवडणूक चिन्हावर बंदी घालावी अशी मागणीही केली. मात्र पिपाणी या चिन्हावर आम्ही बंदी घालणार नसल्याचे स्पष्ट करत त्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलेल्या निवडणूक चिन्हातील तुतारी वाजविणारा मनुष्य अधिक गडद आणि सुस्पष्ट करणार असल्याचे सांगितले.

निवडणूक चिन्हात हा बदल केला गेल्याने शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह अधिक सुस्पष्ट होईल असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.

दरम्यान प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांना विचारले असता राजीवकुमार यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *